AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET 2026 : नीट प्रकरणात मोठा ट्विस्ट, पेपर लीक झालाच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण पहिल्यांदाच समोर

नीट पेपर लीक प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) चे प्रमुख अभिषेक सिंह हे गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीसमोर हजर झाले, त्यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर मोठा दावा केला आहे

NEET 2026 : नीट प्रकरणात मोठा ट्विस्ट, पेपर लीक झालाच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण पहिल्यांदाच समोर
नीट प्रकरणात मोठी अपडेट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 22, 2026 | 3:17 PM
Share

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा (NEET2026) सध्या चांगलीच चर्चेत आहे. नीटचा पेपर फुटल्यामुळे केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआने अनेक जणांना अटक केलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या देखील काही जणांचा समावेश आहे. आरसीसीचे संचालक मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी, मनिषा मांढरे यांना सीबीआयने अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे, ते म्हणजे या प्रकरणात राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) चे प्रमुख अभिषेक सिंह हे गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीसमोर हजर झाले, त्यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर मोठा दावा केला आहे. नीट 2026 चा कोणताही पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता, मात्र त्यातील काही प्रश्न लीक झाले होते, असा दावा अभिषेक सिंह यांनी केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार परीक्षा आयोजित करणाऱ्या केंद्रीय एजन्सीकडून असा दावा करण्यात आला आहे की, परीक्षा रद्द करण्याचं प्रमुख कारणं हे परीक्षेत झालेल्या गैरमार्गांचा वापर हे आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीचे प्रमुख अभिषेक सिंह यांनी स्थायी समितीसमोर असा दावा केला आहे की परीक्षेदरम्यान अनियमितता आणि गैरप्रकारांची उदाहरणं समोर आली आहेत, मात्र पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता, परंतु नीटचे काही प्रश्न लीक होणं देखील गंभीर प्रकार आहे, यामुळे संपूर्ण परीक्षा प्रणालीवरील विश्वास डळमळू शकतो, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत बोलताना अभिषेक सिंह आणि उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव विनीत जोशी यांनी संसदीय समितीला सांगितं की, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. अधिकारी योग्य दिशेनं पुढे जात आहेत. पेपर लीक होऊ नये यासाठी काही शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत, आणखी काही गोष्टींवर काम सुरू आहे. पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता, मात्र काही प्रश्न लीक झाल्यानं ही परीक्षा रद्द करण्यात आली, अशी माहिती संसदीय समितीला देण्यात आली आहे. दरम्यान आता 21 जून रोजी पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेतली जाणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ