AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! मनीषा हवालदारला थेट… नेमकं काय घडलं?

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा हवालदारबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आता नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या...

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! मनीषा हवालदारला थेट... नेमकं काय घडलं?
NEET paper leakImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 23, 2026 | 12:25 PM
Share

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरमध्ये अधिक गडद होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लातूरमध्ये आपली पाळेमुळे घट्ट रोवली असून, गेल्या आठ दिवसांपासून येथे सातत्याने चौकशीचे सत्र सुरू आहे. आता या प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तसेच या तपासादरम्यान सीबीआयने आतापर्यंत लातूरमधील तब्बल चार बड्या डॉक्टरांची चौकशी केल्याने वैद्यकीय आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा हवालदारवर ती कार्यरत असलेल्या संस्थेने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. मनीषा हवालदार ही ‘विद्या प्रसारिणी सभा’ या नामांकित संस्थेत कार्यरत होती. तिच्या अटकेची बातमी समोर येताच संस्थेने तातडीने पावले उचलली आहेत.

याबाबत अधिकृत भूमिका मांडताना विद्या प्रसारिणी सभेचे सेक्रेटरी सतीश गवळी यांनी सांगितले की, “काल सायंकाळी प्रसारमाध्यमांच्या द्वारेच आम्हाला मनीषा हवालदारला नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्याची माहिती मिळाली. आमच्या संस्थेला गेल्या अनेक वर्षांपासून एक मोठी आणि गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. असे असताना संस्थेच्या एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करणे अत्यंत निषेधार्थ आहे. या कृत्याची गंभीर दखल घेत आम्ही मनीषा हवालदारवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.”

‘विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी’

संस्थेचे सेक्रेटरी सतीश गवळी यांनी पुढे स्पष्ट केले की, या पेपरफुटीमुळे देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. सीबीआयच्या तपास यंत्रणेला संस्थेकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मनीषा हवालदारवर कायद्यानुसार कठोरभरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

बड्या कोचिंग क्लासेसशी ‘कनेक्शन’ असल्याचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या रडारवर आलेल्या या चार डॉक्टरांमध्ये नामांकित आयुर्वेदिक आणि बालरोग तज्ज्ञांचा (Pediatricians) समावेश आहे. या चारही डॉक्टरांचे लातूरमधील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था चालक पी. व्ही. कुलकर्णी किंवा मोटेगावकर यांच्याशी थेट कनेक्शन असल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे. या डॉक्टरांच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून, आगामी काळात लातूरमधील आणखी काही बड्या व्यक्तींची आणि डॉक्टरांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ