जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय…प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक, म्हणाले की…

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्त येत्या २३ जुलै रोजी मुंबई बंदची हाक दिली आहे.

जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय...प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक, म्हणाले की...
prakash ambedkar
| Updated on: Jul 21, 2026 | 5:43 PM

दिल्लीत जंतरमंतर येथील सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी येत्या २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये विरोधी पक्षांनी देखील सामील व्हावे असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.  वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ॲड. आंबेडकर यांनी NEET परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली असून, फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी समोर असल्याचा दावा त्यांनी केला. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून, सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या धोरणाविरोधात देशभर जन आंदोलन उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

दिल्ली पोलिसांनी तरुण आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला आहे. दिल्लीत जनरल डायर पुन्हा जिवंत झाला आहे अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. नीटची पुन्हा परीक्षा घेण्यात आली असली तरी त्यात अनेक चुका आहेत. शिक्षा झाली की दृष्टिकोन मिळतो, मात्र सरकारची तशी मानसिकता दिसत नाही. आरएसएस लोकशाही मानत नाही. ते ठोकशाहीवर विश्वास ठेवतात असेही प्रकाश महाजन यांनी यावेळी आरोप करताना म्हटले आहे.

जनआंदोलन हे असे आंदोलन आहे, ज्याला भले भले डायर घाबरतात, विरोधकांना आव्हान आहे त्यांनी हे आंदोलन देशभरात केले पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा राग बाहेर आला पाहिजे असेही प्रकाश आंबडेकर यावेळी म्हणाले.

सरकारच आंतकवादी आहे

सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत झालेले नीट पेपर फुटी प्रकरणातील आंदोलक हे आंतकवादी असल्याची टीका केली आहे, याबाबत प्रतिक्रिया विचारली असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की हे सरकारच आंतकवादी आहे. मुंबईतील आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत ते बेकायदेशीर आहे. हे कोर्टात टिकणार नाही असाही दावा त्यांनी यावेळी केला.

विद्यार्थ्यांवरील लाठीमारामुळे जनतेमध्ये मोठा संताप असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील विविध जिल्हास्तरीय आणि प्रादेशिक संघटनांशी चर्चा करून  येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपसोबत जाण्याची भूमिका नसलेल्या सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण असेल. कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ दिली जाणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बंद शांततेत पार पाडला जाईल, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

 

Follow Us