AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Pradhan Resigns : ही तर शेवटाची सुरूवात , भाजपा आता बॅकफूटवर.. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांची प्रतिक्रिया

NEET परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत मोठे आंदोलन पेटले होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांनी जोर लावला. अनेक दिवसांच्या संघर्षांनंतर आणि देशभरातील तरुणाईच्या पाठिंब्यानंतर अखेर प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा आंदोलकांच्या लढ्याचा मोठा विजय मानला जात असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Dharmendra Pradhan Resigns : ही तर शेवटाची सुरूवात , भाजपा आता बॅकफूटवर.. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांची प्रतिक्रिया
| Updated on: Jul 25, 2026 | 3:19 PM
Share

नीट परीक्षा गैरव्यवहार, पेपरफुटीच्या मुद्यावरून गेल्या महिन्याभरापासून राजाधानी दिल्लीत आंदोलन पेटलं आहे . शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषम केलं, कॉक्रोच जनता पार्टीनेही राजीनाम्याचा हा मुद्दा लावून धरला. देशभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला, आंदोलन जसंजसं पेटू लागलं तसतसं विरोधक, राजकारणी, अनेक , नेते सेलिब्रिटीही आंदोलकांच्या पाठिशी उभे राहिले आणि सरकारसमोर राजीनाम्याच्या मागणी ने जोर धरला. अखेर अनेक दिवसानंतर सरकार या आंदोलकांसमोर झुकल्याचं चित्र दिसत आहे, कारण शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी देशातील तरुणांना गोंधळाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही, हा माझा दृढनिश्चय आहे, असं म्हणत प्रधान यांनी आपला राजीनामा सादर केला असून त्यामुळे आंदोलकांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आतात विविध प्रतिक्रिया समोर येत असून विरोधकांनीही यावर आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ही तर शेवटाची सुरूवात 

हा विद्यार्थ्यांचा आणि युवाशक्तीचा प्रचंड विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे. प्रधानांनी पंतप्रधानांकडे राजीनामा दिला आहे, पण तो स्वीकारण्यात आला आहे का, त्यानंतर पर्यायी व्यवस्था वगैरे काय केली आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. हा मोदी सरकारच्या काळाताल, पहिला जबाबदारी स्वीकारून दिलेला राजीनाम आहे.  एका वाक्यात सांगायचं झालं तरthis is beginning of the end..  हे सरकार काही फार काळ टिकणार नाही. मोदी सरकारचा मनमानी कारभार जनता स्वीकारणार नाही, हे यातून सिद्ध झालेलं आहे, अशा शब्दांत चव्हाण यांनी सरकावर  हल्ला चढवला.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे जो दबाव निर्माण झाला होता, यामुळे सरकारला काही निर्णय घेणं भाग पाडलं गेलं. खरं म्हणजे हा राजीनामा जर संसदेचं अधिवेशन सुरु होण्यापूर्वी  झाला असता, तर ते अधिवेशन सुरळीतपणे चाललं असतं,कदाचित काही ठोस उपाययोजना करता आली असती. पण आत्तापर्यंतची सरकारची कारकीर्द पाहता कधीही जबाबदारी स्वीकारायची नाही, आपली चूक कबूल करायची नाही, हट्टीपणाने सरकार चालवायचं हे गेली 12 वर्षं आपण पाहिलं, असे टीकास्त्र चव्हाणांनी सरकारवक सोडलं. पण आता प्रचंड मोठ्या युवाशक्ती समोर सराकराल नमतं घ्यावं  लागलं, झुकावं लागलं, असंही त्यांनी नमूद केलं.

मला या पिढीचा अभिमान

उशीरा का होईना राजीनामा झालाय ही आनंदाची बातमी आहे. या नव्या, युवा पिढीचा मला सार्थ अभिमान आणि कौतुक मला वाटतंय, हा लढा त्यांनी जिंकलाय. सरकार जेव्हा त्यांच्याविरोधात होतं, पोलिस लाठीचार्ज करत होते, धमक्या देत होते, यत्याला कशालाही न भिता ज्या पद्धतीने ही पोरं लढली ना, मजा आ गया. मला या युवा पिढीचा खूप अभिमान वाटतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हा युवाशक्तीचा विजय

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे युवाशक्तीचा विजय आहे,अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली.  या आधीच राजीनामा झाला असता तर एवढा संघर्ष उभा राहिला नसता. भारतीय जनता पार्टी पक्ष आता बॅकफुट वरती गेला आहे. काँग्रेस पक्ष युवकांच्या पाठीशी कायमच सोबत राहील, असंही वानखेडे म्हणाले.

Follow Us
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना