AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जून महिन्यात रिटायर होणार होती… त्या आधीच बिंग फुटलं, तिसरी मनीषा कोण? सदाशिव पेठेत खळबळ

सीबीआयने शुक्रवारी पुण्याच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरप्रकारात अटक झालेल्या 'मनीषा' नावाच्या त्या तिसऱ्या आरोपी ठरल्या आहेत.

जून महिन्यात रिटायर होणार होती... त्या आधीच बिंग फुटलं, तिसरी मनीषा कोण? सदाशिव पेठेत खळबळ
NEET Paper Leak Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 23, 2026 | 1:17 PM
Share

दिवसेंदिवस राज्याच नीट पेपरफुटी प्रकरण चांगलेच चर्चेत येत चालले आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अधिक तीव्र केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता पर्यंत सीबीआयने या प्रकरणी मनीषा वाघमारे, मनीषा मांढरेंवर कारवाई केली होती. आता आणखी एका मनीषाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. सीबीआयने शुक्रवारी पुण्याच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना अटक केली आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) मनीषा हवालदार यांची ‘भौतिकशास्त्र’ (Physics) विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, त्या येत्या जून महिन्यातच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार होत्या. तसेच अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपी मनीषा मांढरे आणि हवालदार या एकमेकींना चांगल्या ओळखत होत्या आणि त्यांच्यात वारंवार भेटीगाठीही होत असत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

७ तासांच्या छाप्यांनंतर घरातून अटक; दोन्ही मुले विदेशात

मनीषा हवालदार या पुण्याच्या सदाशिव पेठेतील ‘लक्ष्मी निवास सोसायटी’मध्ये गेल्या २३ वर्षांपासून पती आणि वडिलांसोबत राहत आहेत. त्यांची दोन्ही मुले सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सीबीआयचे पथक त्यांच्या फ्लॅटवर दाखल झाले होते. तब्बल ७ तास चाललेल्या कसून चौकशी आणि झाडाझडतीनंतर सीबीआयने घरातील काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि वस्तू जप्त केल्या व त्यानंतर हवालदार यांना ताब्यात घेऊन अटक केली.

मुख्याध्यापिका हवालदार निलंबित

मनीषा हवालदार या १९९२ पासून शाळेत कार्यरत होत्या. त्यांच्या अटकेनंतर हिरालाल सराफ विद्यालयाचे सचिव सतीश भालचंद्र गवळी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “मनीषा हवालदार यांना नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्याचे आम्हाला प्रसारमाध्यमांद्वारेच समजले. त्या ‘NTA’ वर तज्ज्ञ म्हणून काम करत होत्या, याची संस्थेला पुसटशीही कल्पना नव्हती आणि त्यांनी कधी तसे सांगितलेही नव्हते. त्या असे काही करतील असे आम्हाला कधीच वाटले नव्हते, या प्रकारामुळे शाळेचे नाव खूप बदनाम झाले आहे. संस्थेने तात्काळ कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबित केले आहे” असे म्हटले जात आहे.

दरम्यान, सीबीआयच्या टीमने गुरुवारी शाळेला भेट देऊन मुख्याध्यापिका हवालदार यांच्या केबिनमधील कॉम्प्युटरची हार्ड डिस्क, शाळेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि काही महत्त्वाची कागदपत्रे तपासासाठी जप्त केली आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ