AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेपर सेट करणारा शिक्षक, NTA च्या तज्ज्ञ पॅनलमधली शिक्षिका अन् एक कोडवर्ड; NEET पेपरफुटीचे रॅकेट नेमके कसे चालायचे?

NEET पेपरफुटी प्रकरणात पेपर सेट करणारे शिक्षक आणि एनटीएच्या तज्ज्ञ पॅनलमधील शिक्षिकाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सीबीआयने या महाराष्ट्र मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून ब्युटी पार्लरच्या आडून चालणारे हे नेटवर्क थेट राजस्थानपर्यंत कसे पोहोचले, याचा खुलासा झाला आहे.

पेपर सेट करणारा शिक्षक, NTA च्या तज्ज्ञ पॅनलमधली शिक्षिका अन् एक कोडवर्ड; NEET पेपरफुटीचे रॅकेट नेमके कसे चालायचे?
NEET
| Updated on: May 17, 2026 | 10:02 AM
Share

नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून (CBI) अत्यंत वेगाने केला जात आहे. याप्रकरणी रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. गेल्या २४ तासात सीबीआयने ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पुण्यातून वनस्पतीशास्त्र (Botany) विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांधारे यांना अटक केली आहे. त्यांची दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात कसून चौकशी करण्यात आली. यासह या प्रकरणातील आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी आणि त्याची साथीदार मनीषा वाघमारे असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयने ८ जणांना आधीच ताब्यात घेतले आहे. आता हे पेपरफुटीचे रॅकेट नेमके कसे चालायचे याची माहिती समोर आली आहे.

२०२६ च्या नीट पेपरफुटीमध्ये महाराष्ट्र मॉड्यूलने अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या प्राध्यापिका मनीषा मांधारे या नीट परीक्षेसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) तज्ज्ञ पॅनेलचा भाग होत्या. तर मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी देखील अनेक वर्षांपासून नीटचे पेपर तयार करणाऱ्या ‘एनटीए’च्या राष्ट्रीय पॅनेलवर कार्यरत होते. त्यामुळे त्याच्याकडे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र (Zoology) विषयांच्या प्रश्नपत्रिका पूर्णपणे उपलब्ध होत्या.

पी.व्ही. कुलकर्णी पुण्यात विद्यार्थ्यांसाठी घरगुती शिकवणी वर्ग चालवायचा. या वर्गांमध्ये तो विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न (Guess Paper) म्हणून प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न वहीत लिहून घ्यायला सांगायचा. तसेच पाठ्यपुस्तकातही काही प्रश्न खुणा करायला सांगायचा. यावेळी सांकेतिक शब्दांचा वापर केला जायचा. या नेटवर्कमध्ये फुटलेल्या मूळ प्रश्नपत्रिकेसाठी Guess पेपर हा सांकेतिक कोडवर्ड वापरून पैशांची घासाघीस केली जात होती. “हे पाठ करा, मी जे सांगतो ते विसरू नका. जर तुम्ही विसरलात, तर तुम्ही हरलात,” असा कडक संदेश कुलकर्णी आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचा.

ब्युटी पार्लरच्या नावाखाली पेपरफुटीचे जाळे

या रॅकेटमध्ये पी. व्ही. कुलकर्णी याने मनीषा वाघमारे हिच्याशी हातमिळवणी केली होती. मनीषा वाघमारे पुण्यात ब्युटी पार्लर चालवत असे. मात्र, या पार्लरच्या आडून तिने नीट (NEET) आणि जेईई-सीईटी (JEE CET) परीक्षेचे पेपर फोडणारे एक मोठे नेटवर्क तयार केले होते. तिने कोचिंग क्लासेस, समन्वयक आणि वैद्यकीय सल्लागार कंपन्यांची एक टीम तयार केली होती. ज्यामध्ये धनंजय लोखंडे, शेषराव आंबे, मोहक पराडकर आणि नमन नावाच्या तरुणाचा समावेश होता. हे सर्व सध्या या प्रकरणात आरोपी आहेत.

महाराष्ट्रातून राजस्थानपर्यंत पोहोचले नेटवर्क

सीबीआयच्या तपासात असे उघड झाले आहे की, हे नेटवर्क महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये सक्रिय होते. यात प्रामुख्याने पुणे, अहिल्यानगर, नाशिक, लातूर, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. बीडमार्गे हे जाळे थेट राजस्थानमधील गुरुग्रामपर्यंत पोहोचले. चौकशीत समोर आले की, आरोपी धनंजयने टेलिग्राम ॲपद्वारे नाशिकच्या शुभम खैरनारला पेपर पाठवला. शुभमने तो पुढे गुरुग्रामच्या यश यादवला दिला आणि यश यादवने राजस्थानमधील एका कुटुंबाला हा पेपर तब्बल १० लाख रुपयांना विकला.

दोन्ही मुख्य आरोपींना १० दिवसांची सीबीआय कोठडी

सीबीआयच्या पथकाने या कारवाई दरम्यान अनेक लॅपटॉप, मोबाईल फोन आणि बँक स्टेटमेंट्ससह महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. शनिवार, १६ मे रोजी सीबीआयने मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांधारे यांना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोन्ही आरोपींची गुन्ह्याची भीषणता लक्षात घेऊन त्यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, जयपूरमधून अटक करण्यात आलेला आरोपी दिनेश बिवल याची भाची जी एसएमएस मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे, तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, आगामी काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही अनेक मोठ्या व्यक्तींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?