पुण्याचे ४ जण नेपाळमध्ये अडकले, टूर्स कंपनीने सोडलं वाऱ्यावर; तरुणीने सांगितली नेपाळमधील विदारक परिस्थिती

पुण्याचे ४ जण नेपाळमध्ये अडकले आहेत. टूर्स कंपनीने सोडलं वाऱ्यावर आरोप पर्यटक तरुणीने केला आहे. याच पर्यटक तरुणीने नेपाळमधील विदारक परिस्थिती सांगितली.

पुण्याचे ४ जण नेपाळमध्ये अडकले, टूर्स कंपनीने सोडलं वाऱ्यावर; तरुणीने सांगितली नेपाळमधील विदारक परिस्थिती
nepal news update
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 8:27 AM

नेपाळमध्ये भीषण महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नेपाळमध्ये भारतातील शेकडो नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील 288 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांची शोधाशोध सुरू आहे. नेपाळमधील या पुरात पुण्याच्या 4 पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. यातील पर्यटक तरुणीने नेपाळमधील विदारक परिस्थिती सांगितली आहे.

नेपाळमध्ये फिरायला गेलेले भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. तामिळनाडूमधील 21 भारतीय अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तिबेटमध्ये अडकलेल्या 200 भारतीयांनीही मदतीची मागणी केली आहे. बेपत्ता असलेल्या 288 भारतीयांपैकी 73 जण हे त्रिशुली वन जलविद्युत प्रकल्पासाठी काम करत होते. बचाव पथकांकडून या कामगारांची शोधाशोध सुरू आहे. भारतीय दूतावासाने या प्रकल्पाच्या प्रमुखाशी संपर्क साधल्यानंतर बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असल्याचे सांगितले. या भीषण परिस्थितीत भारतानेही नेपाळला मदतीची तयारी दर्शवली आहे.

कैलास मानसरोवरला गेलेल्या पुण्याचे 4 पर्यटक अडकले

नुकत्याच झालेल्या पूरस्थितीतून बचावलेल्या कैलास मानसरोवर येथे यात्रेसाठी गेलेल्या पूजा भोसले या युवतीने राज्य सरकारकडे मदतीची याचना केलीय. ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या कमतरतेमुळे आम्हाला भारतात जाण्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी याचना या युवतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे केलीय. ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने आम्हाला यात्रेसाठी नेले, त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले, असा आरोप देखील पूजा भोसले या युवतीने केलाय.

पुराचा धोका कायम

नेपाळमधील पुरात आतापर्यंत 350 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. यानंतरही नेपाळमधील महापुराचं संकट कायम आहे. नेपाळमधील भोते कोशी नदी परिसरात आता पुराचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळ-चीन सीमेवर नदीचा प्रवाह अडला आहे. त्यामुळे या भागात मोठा तलाव तयार झाला आहे. हा तलाव फुटल्यास पुन्हा पाण्याचा लोंढा येऊ शकतो. या तलावात सुमारे 20 लीटर घनमीटर पाणी साचले आहे. आता पुढील काही दिवसांत आणखी पाणी जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे नेपाळच्या जलविज्ञान आणि हवानविभागाला चीनने धोक्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर छोछेन खोला आणि पुरेपु त्सांग्पो नद्यांच्या संगमाजवळही तलाव तयार झालाय. नदीचा प्रवाह अडल्याने तयार झालेला तलाव कधीही फुटण्याची शक्यता आहे, अशी भीती चीनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us