AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच पार्टीची नवी सर्वात मोठी घोषणा, येत्या 20 जूनला…दिल्लीमध्ये आणखी मोठे आंदोलन!

कॉकरोच जनता पार्टी अस्तित्त्वात आली तेव्हा हे फक्त सोशल मीडियावरच असेल. दिल्लीत जमिनीवर आंदोलन करण्यासाठी कोणीही येणार नाही, असे म्हटले जात होते. परंतु 6 जून रोजी पूर्ण जंतर-मंतरचे मैदान आंदोलकांनी भरलेले होते, असेही ते म्हणाले.

कॉकरोच पार्टीची नवी सर्वात मोठी घोषणा, येत्या 20 जूनला...दिल्लीमध्ये आणखी मोठे आंदोलन!
abhijeet dipke and cockroach janta partyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2026 | 3:13 PM
Share

Cockroach Janta Party : देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीची सगळीकडे चर्चा आहे. नीट रीक्षेत झालेल्या गोधळांचा मुद्दा या कॉकरोच जनता पार्टीने उचलू धरला आहे. याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या उपस्थितीत 6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. आता कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जात आहे. दरम्यान, अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकी काय घोषणा केली?

अभिजित दिपके यांनी आज (10 जून) पत्रकार परिषद घेतली. यावळी त्यांनी येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन केले जाईल, अशी घोषणा केली. आम्ही सध्या पुण्यात आंदोलन करत आहोत. आमच्यासोबत पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. आता लवकरच आम्ही या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देऊ, असे अभिजित दिपके यांनी सांगितले.

तसेच, कॉकरोच जनता पार्टी अस्तित्त्वात आली तेव्हा हे फक्त सोशल मीडियावरच असेल. दिल्लीत जमिनीवर आंदोलन करण्यासाठी कोणीही येणार नाही, असे म्हटले जात होते. परंतु 6 जून रोजी पूर्ण जंतर-मंतरचे मैदान आंदोलकांनी भरलेले होते, असेही ते म्हणाले.

मी सगळ्या आई-वडिलांना सांगेन की…

अभिजित दिपके यांनी देशभरातील पालकांना आवाहन केले आहे. “तुमची मुलं सरकारला जाब विचारत असतील, राजकारणावर बोलत असतील तर तुम्हाला भीती वाटत असेल. माझ्या आईलाही भीती वाटत आहे. माझी आई तर तू परत येऊच नको, असे सांगत होती. हे तुला अटक करतील, तुझ्यावर हल्ला होईल, असे ती सागंत होती. परंतु यावे लागेल. कोणालातरी बोलावंच लागेल, असे मी तिला सांगितले. मी सगळ्या आई-वडिलांना सांगेन की तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबवू नका,” असे दीपके म्हणाले.

मी तुरुंगात जाईल पण…

“मी एकटा बोलत असेल तर ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. परंतु लाखो, करोडो मुलं बोलतील तर कोणाचा आवाज दाबण्याची त्यांची हिंमत होणार नाही. तुरुंगात कोणाला जायचंच असेल तर मी जाईल. मी तुमच्या मुलांना तुरुंगात जाऊ देणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतो. परंतु तुमच्या मुलांना बोलण्यापासून रोखू नका,” असे आवाहन अभिजित दीपके यांनी केले. तसेच पुण्यातील आंदोलन हे जंतर-मंतरपेक्षा मोठे असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर