AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना १ ऑगस्टपासून दिलासा,लागलीच गर्दी न करण्याचे ग्राहक पंचायतीचे आवाहन

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध लादले होते. त्यानंतर बँकेच्या सामान्य ग्राहकांचे धाबे दणाणले होते. आता १ ऑगस्टपासून बँकेच्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना १ ऑगस्टपासून दिलासा,लागलीच गर्दी न करण्याचे ग्राहक पंचायतीचे आवाहन
New India Cooperative Bank
| Updated on: Jul 28, 2025 | 6:04 PM
Share

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांवर बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर १३ फेब्रुवारी २०२५ पासून रिझर्व बँकेने कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे सामान्य ग्राहकांची आयुष्यभराची जमापुंजी बँकेत जमा असल्याने सर्वसामान्यांच्या जीवाला घोर निर्माण झाला होता. त्यानंतर लगोलग ठेवीदारांना ४५ दिवसांत विम्यापोटी ५ लाखांपर्यतच्या ठेवी परत करण्याची सुध्दा अशोभनीय घाई रिझर्व बँकेने दाखवली होती. त्यामुळे न्यू इंडियाच्या ठेवीदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरून ही बँक आता बुडणार असे चित्र उभे राहिले होते. परंतू आता ही बँक सारस्वत बँकेत विलीन होत असून १ ऑगस्टपासून या बँकेचा ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.

परंतु सुदैवाने सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक विलीनीकरणाचा दिलेला प्रस्ताव रिझर्व बँकेने संमत केला आहे. आणि या प्रस्तावाला आता दोन्ही बँकांच्या विशेष सर्वसाधारण सभांमध्ये मान्यता मिळाल्यामुळे १ ऑगस्टपासून न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांना कायमस्वरुपी दिलासा मिळणार आहे. त्यांच्या संपूर्ण ठेवी १०० टक्के सुरक्षित असतील असे सारस्वत बँकेने सर्व ठेवीदारांना म्हटले आहे. याब‌द्दल सर्व ठेवीदारांतर्फे मुंबई ग्राहक पंचायतीने सारस्वत बँकेच्या संचालक मंडळाला धन्यवाद देऊन त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

मुंबई ग्राहकपंचायतीचे आवाहन

त्याचबरोबर १ ऑगस्टपासून या बँकेचे व्यवहार सारस्वत बँकेच्या नावाने सुरु होत असले तरीही न्यू इंडियाच्या सर्व ठेवीदारांनी पहिल्याच दिवशी बँकेत गर्दी करून आपल्या ठेवी काढण्याची घाई करू नये असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायत करत आहे. गेले पाच महिने आपल्या ठेवी वापरता न आल्याने या बँकेच्या सर्वच ठेवीदारांची आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होऊन त्यांना अनेक हाल -अपेष्टांना सामोरे जावे लागले होते हे जरी खरे असले तरी सारस्वत बँकेसारख्या अत्यंत विश्वसनीय बँकेने सहकार्य केल्यामुळेच आज या ठेवीदारांना संपूर्ण सुरक्षितता लाभली आहे. हे लक्षात घेऊन ठेवीदारांनी आपल्या गरजे पुरत्याच रकमा सध्या काढून सारस्वत बँकेला आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी न्यू इंडियाच्या ठेवीदारांना केले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.