AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात…

NIA raids cyber terrorism : NIA ने सायबर दहशतवाद प्रकरणात 5 राज्यांमध्ये 5 ठिकाणी छापेमारी केली. पुणे शहरातही भयंकर कट शिजत होता? राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागले काय?

मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात...
गुजरात सायबर दहशतवाद प्रकरणात NIAची देशभरात मोठी कारवाई
| Updated on: Aug 24, 2026 | 10:30 PM
Share

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सायबर दहशतवाद प्रकरणात 5 राज्यांमध्ये 5 ठिकाणी छापेमारी केली. या व्यापक धाडसत्रात यंत्रणेच्या हाती खूप काही लागले आहे. प्रकरणात यापूर्वीच 2 आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यांसाठी आरोपींना तांत्रिक मदत व प्रशिक्षण देणाऱ्यांचा तपासातून शोध लागला आहे. पुणे शहरातही याविषयीचा कट शिजत असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह 5 ठिकाणी NIA ने छापे टाकले आहेत. त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा सातत्याने देशातंर्गत सुरू असलेल्या सायबर दहशतवादी हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहे. या छापासत्रामुळे आरोपींचे धाबे दणाणले आहे.

जुन्नरसह 5 ठिकाणी NIA चे छापे

गुजरात सायबर दहशतवाद प्रकरणात NIA ची देशभरात मोठी कारवाई पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह 5 ठिकाणी NIA ने छापे मारले. यामध्ये गुजरातमधील नडियाद, तेलंगणातील रामागुंडम, बिहारच्या गोपालगंज आणि दिल्लीत छापे टाकण्यात आले. यामुळे दहशतवाद्यांची नवीन मोड्स ऑपरेंडी समोर आली. प्रकरणात यापूर्वीच 2 आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यांसाठी आरोपींना तांत्रिक मदत व प्रशिक्षण देणाऱ्यांचा तपासातून शोध लागला आहे.

सरकारी यंत्रणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न

ऑपरेशन सिंदूरदरम्यान केंद्र सरकारच्या 54 वेबसाइट्सवर DDoS हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकारी महत्त्वाच्या संगणकीय संसाधनांना लक्ष्य केल्याचे ही समोर आले. प्रकरणात यापूर्वीच 2 आरोपींना अटक, हल्ल्यांसाठी आरोपींना तांत्रिक मदत व प्रशिक्षण देणाऱ्यांचा तपासातून शोध घेण्यात येत आहे. कारवाईत 3 लॅपटॉप, 5 मोबाईल फोन, पेन ड्राइव्हसह डिजिटल उपकरणे व आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. गुजरात ATS ने दाखल केलेल्या प्रकरणाचा NIA कडून तपास सुरू आहे. या कारवाईमुळे देशभरातील प्रशासकीय वेबसाईट आणि लिंकवर हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. तर देशातील काही शहरातून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपींचा तपास करण्यात येत आहे.  राष्ट्रीय तपास यंत्रणा ही भारताची केंद्रीय दहशतविरोधी आणि तपास संस्था आहे. मुंबईवरील 2008 च्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा कायदा, 2008 अंतर्गत तिची स्थापना करण्यात आली. ही संस्था देशाच्या सुरक्षेला आणि एकात्मतेला धोका पोहोचवणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करते.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
'2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : '2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'
सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप