AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nida Khan Case : इम्तियाज जलील नाशिकला जाऊन निदा खानला भेटले, मंत्र्याच्या आरोपाने खळबळ; सर्वात मोठी मागणी काय?

निदा खान प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत की, जलील नाशिकला जाऊन निदा खानला भेटले होते. निदाला घर देण्यास त्यांनीच एमआयएमच्या नगरसेवकास भाग पाडले. 'लव्ह जिहाद, धर्मांतर'चा आरोप करत शिरसाट यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

Nida Khan Case : इम्तियाज जलील नाशिकला जाऊन निदा खानला भेटले, मंत्र्याच्या आरोपाने खळबळ; सर्वात मोठी मागणी काय?
| Edited By: | Updated on: May 09, 2026 | 1:17 PM
Share

निदा खान प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. एमआयएमच्या नगरसेवकाला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आता नवा आरोप केला आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे निदा खानला नाशिकला जाऊन भेटले होते, असा धक्कादायक आरोप संजय शिरसाट यांनी केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही शिरसाट यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेऊन शिरसाट यांनी हे धक्कादायक खुलासे केले आहेत.

निदा खान प्रकरणात ज्या नवा घटना घडत आहेत, ती माहिती समोर येत असून अत्यंत धक्कादायक आहे. निदाला तिथे कुणी पाठवलं याचा खुलासा झाला पाहिजे. निदा मुंब्र्याला का गेली नाही? ती एमआयएमच्या संपर्कात होती. इम्तियाज जलील तिला नाशिकला जाऊन भेटले होते. इम्तियाज जलील यांनीच तिला घर देण्यासाठी नगरसेवकाला भाग पाडलं, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. धर्मांतर करणं, लव्ह जिहाद करणं, नशेखोर बनवणं अशा तीन स्टेजवर ही यंत्रणा काम करत आहे. हा गंभीर प्रकार आहे. याला राजकीय वळण देऊ नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नगरमध्ये कशी राहिली?

निदा खानचा नगरशी काहीच संबंध नाही. तरीही ती नगरमध्ये दीड महिना राहते. एक म्हातारा बाहेर यायचा. कोणी बाहेर पडायचे नाही. ज्या नगरसेवकाचं हे घर आहे तो एमआयएमचा आहे. इम्तियाज जलील यांनीच नगरसेवकाला तिला घर द्यायला मजबूर केलं. जलील यांची कालची पत्रकार परिषदेतील देहबोली पाहा. कोणतीही केस बघा. पाहिले आरोपीला पकडले जाते आणि नंतर चौकशी वगैरे केली जाते. त्या कामात सुद्धा अडथळा आणला, असं ते म्हणाले.

काश्मीर फाईल प्रमाणेच…

आरोपीला फरार करणे आणि पुन्हा छातीठोकपणे चार्जशीट आहे का? हे विचारणे हे जाणून बुजून केले जात आहे. अनेक ठिकाणी निदा खान प्रकरण घडत आहे. काश्मीर फाईल प्रमाणे हे घडत आहे, याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

एसआयटी चौकशी करा

छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच घडलेल्या निदा खान अटक प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या प्रकरणातील आरोपांचा समाजमाध्यमांवर आणि जनसामान्यांमध्ये होत असून, विशेषत: एमआयएम पक्षाशी संबंधित काही व्यक्ती आणि नगरसेवक मतीन पटेल तसेच माजी खासदार इम्तियाज जलील यांची नावे समोर येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात संपूर्ण घटनेचा सखोल तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी केली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?