AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निलेश चव्हाण नेपाळला कसा पोहोचला? वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला आज नेपाळमधून अटक करण्यात आलं आहे, त्याच्यावर कस्पटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप आहे.

निलेश चव्हाण नेपाळला कसा पोहोचला? वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 30, 2025 | 10:16 PM
Share

वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी असलेला निलेश चव्हाण हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता, पोलिसांच्या सहा पथकांकडून त्याचा शोध सुरू होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. निलेश चव्हाण याला पिंपरी -चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून अटक केलं आहे. वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं. हे बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे  कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

नेमका काय आहे आरोप?  

वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं, निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्मा हिचा मित्र आहे. दरम्यान वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी आलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे, तर बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. सुरुवातीला पोलिसांच्या तीन पथकांकडून निलेश चव्हाण याचा शोध सुरू होता, त्यानंतर पथकांची संख्या वाढवण्यात आली, सहा पोलिसांचे पथक निलेश चव्हाणच्या मागावर होते. अखेर त्याला आज नेपाळमधून अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. निलेश चव्हाण नेपाळला कसा पोहोचला, एवढ्या दिवस तो कुठे होता  याबाबत पोलीस अधिकारी संदीप डोईफोडे यांनी माहिती दिली आहे.

डोईफोडे यांनी काय सांगितलं? 

निलेश चव्हाण हा पुण्याहून रायगडला गेला, तिथून तो बायरोड दिल्लाला पोहोचला. दिल्लीला गेल्यानंतर तो बसने गोरखपूर युपीला गेला. उत्तर प्रदेशमधून मग तो नेपाळ बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये गेला, त्यानंतर काठमांडू आणि त्या परिसरामध्ये राहून परत तो बॉर्डर ओलांडून इकडे येण्याचा प्रयत्न करत होता.

आज आपल्या  देशाच्या हद्दीमध्ये आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. नोपाळमध्ये त्याने कधी एन्ट्री केली, तो किती दिवस राहिला या संदर्भातील माहिती चौकशीतून समोर येईल, परंतु त्याचा तीन ते चार दिवसांपासून नेपाळ, भारत बॉर्डर असा  प्रवास सुरू होता. निलेश चव्हाण याच्या शोधासाठी गुन्हे शाखेचो तीन पथक तयार करण्यात आले होते.  त्यातील एक टीम ही फिल्ड वर्क करणारी होती, दुसरी टीम तांत्रिक मदत करत होती. तर तिसरी टीम लोकल कॉर्डिनेशनसाठी बनवण्यात आली होती, अशी माहिती डोईफोडे यांनी दिली.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...