AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून नाराजी, दुष्काळी मदतीवरून सरकारला सवाल; निलेश लंके नेमकं काय म्हणाले?

Nilesh Lanke Statement: केंद्रीय पथकाच्या पाहणीसाठी सरकारची तत्परता, मग शेतकऱ्यांच्या मदतीला विलंब का? असा निलेश लंकेंनी सवाल केला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून नाराजी, दुष्काळी मदतीवरून सरकारला सवाल; निलेश लंके नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Oct 09, 2026 | 4:06 PM
Share

अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी स्वागत केले आहे. मात्र केवळ पाहणी न करता सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे. तसेच आगामी नवरात्र आणि दसऱ्याच्या सणापूर्वीच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर त्यांनी दिल्ली आंदोलन आणि बँक निवडणुकीवर एक वक्तव्य केले आहे. ते आता चर्चे आले आहे.

केंद्रीय पथकाच्या पाहणीसाठी सरकारने दाखवलेली तत्परता शेतकऱ्यांना मदत देतानाही दाखवावी, अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली आहे. दिल्ली येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या आंदोलनावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी निशाणा साधला आहे. इंडिया आघाडीच्या वतीने ना भूतो ना भविष्य असे आंदोलन झाले असून एकावेळी एवढे खासदार रस्त्यावर उतरणे ही विचार करण्याची गोष्ट असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे या सरकार विरोधात जनतेचा आक्रोश आहे.

मतचोरी, ईव्हीएम मशीन, बेरोजगारी असे अनेक प्रश्न देशात असल्याचं लंकेने सांगितलं. तसेच एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी अनेक तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. ज्या युवकांकडे देशाचे भविष्या आहे. त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येत असून हे मोठे दुर्दैव असल्याचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीला खासदार निलेश लंके यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेत्यांना निमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर नाराज गटाची स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीत खासदार निलेश लंके यांनी जिल्ह्याची कामधेनू असलेल्या जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठीच ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलं.

ज्या नेत्यांना सर्वपक्षीय बैठकीत डावलण्यात आलं, अशा सर्वांना एकत्र घेऊन ही बैठक घेण्यात आल्याचे निलेश लंके यांनी सांगितले. तसेच आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र बँकेबाबतचे हेवेदावे आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन निलेश लंके यांनी केले आहे.

Follow Us
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र