तुमच्यात हिम्मत असेल तर…बकरी ईदला…पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर नितेश राणेंनी मनसे, ठाकरे गटाला सुनावलं!

सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द केवळ जैन समाज आणि हिंदू समाजाबद्दल का काढला जातो. बकरी ईदच्या वेळी का कोणी आक्षेप घेत नाही. हिरव्या पट्ट्यांना का मिटवायला बघत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

तुमच्यात हिम्मत असेल तर...बकरी ईदला...पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर नितेश राणेंनी मनसे, ठाकरे गटाला सुनावलं!
nitesh rane and white strips clash
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 9:31 PM

Nitesh Rane Comment On White Strip : सध्या मुंबईत रस्त्यावर काढण्यात येणारे पांढऱ्या रंगाचे पट्टे वादाचे मोठे कारण बनले आहेत. जैन धर्मगुरू, जैन मुनी घरी येत असतील तर अनुयायी रस्त्यावर अशा प्रकारचे पांढऱ्या रंगाचे पट्टे काढतात. जैन मुनींच्या पायाखाली जीव-जंतू मरू नयेत यासाठी हे पट्टे काढले जातात. दरम्यान, मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेने अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्यांना विरोध केला आहे. दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांना विरोध होताच आता भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मनसे आणि ठाकरे गटावर सडकून टीका केल आहे. हिंदूंच्या विरोधात वारंवार कोणी आवाज उठवत असेल तर सरकार म्हणून भूमिका घ्यावी लागेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

बकरी ईदच्या वेळी का कोणी….

नितेश राणे हे सिंधुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रसत्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना होत असलेल्या विरोधावर भाष्य केले. सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द आता वापरला गेलेला आहे. सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द केवळ जैन समाज आणि हिंदू समाजाबद्दल का काढला जातो. बकरी ईदच्या वेळी का कोणी आक्षेप घेत नाही. हिरव्या पट्ट्यांना का मिटवायला बघत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

हिम्मत असेल ना तर…

तसेच, उबाठा आणि मनसेच्या लोकांना बेहरामपाडा, नळ बाजार आणि मुंब्रामध्ये आंदोलन करताना आम्ही कधी बघितलं नाही. भोंगे बंद करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं. पट्टे काढायची हिम्मत असेल ना तर बेहराम पाडा मोहम्मद अली रोड वरचे हिरवे पट्टे काढा, असं खुलं आव्हान राणे यांनी दिले. तसेच हिंदूंच्या विरोधात वारंवार कोणी आवाज उठवत असेल तर सरकार म्हणून भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, ज्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे पट्टे दिसत आहेत, त्या ठिकाणी जाऊन ते मिटवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आता मुंबईत नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता काय तोडगा निघणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us