AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा तर पांढरा जिहाद… तर जैन सोसायट्यात… मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, गिरगावातील वातावरण तापलं

जैन मुनींनी सांस्कृतिक दहशतवाद करू नये. नाही तर जिथे जिथे जैन लोकांच्या सोसायट्या आहे तिथे काळा रंग मारू, असा इशारा मनसेने दिला आहे.

हा तर पांढरा जिहाद... तर जैन सोसायट्यात... मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, गिरगावातील वातावरण तापलं
GirgaonImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 14, 2026 | 11:42 AM
Share

मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांचा वाद विकोपाला गेला आहे. जैन मुनींनी रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यास सुरुवात केली आहे. त्याला मनसेने विरोध केला आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं मनसेने म्हटलं आहे. घाटकोपर, दादर, चर्नीरोडनंतर गिरगावातही पांढऱ्या पट्ट्या आढळून आल्यानंतर मनसेने या पट्ट्यांवर काळा रंग मारण्यास सुरुवात केली. त्याला पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पण आम्ही पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारल्याशिवाय जाणारच नाही. तुम्ही पालिका अधिकाऱ्यांना बोलावून काळा रंग मारा. जैनांची दादागिरी खपपून घेतली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आणि जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गिरगावमधील वातावरण तापलं.

तर मुंबईचं नाव जैन गाव

मनसेने गिरगावमधील रस्त्यावर मारण्यात आलेल्या पट्ट्यांवर काळा रंग मारण्यास सुरुवात केली आहे. हा पांढरा जिहादच आहे. त्यामुळे तो रोखला पाहिजे. तो ऱोखला नाही तर उद्या हे लोक मुंबईचं नाव जैन गाव करायला कमी करणार नाहीत, असा इशाराही मनसेने दिला आहे.

महापालिकेकडून पोलिसांना पत्र

रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि असे प्रकार घडू नये म्हणून महापालिकेकडून पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. जी/उत्तर विभागातील विविध रस्त्यांवर अनधिकृतरित्या पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेच्या जी/उत्तर विभागाने स्पष्ट केले आहे की, संबंधित पट्टे मारण्यासाठी विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच अशा प्रकारच्या कामांना परवानगी देण्याची कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दादर येथील डी.एस. बाबरेकर मार्गासह काही ठिकाणी रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या मते, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस विभागाने आवश्यक ती कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी गस्त वाढवावी, अशी मागणी जी/उत्तर विभागाकडून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे.

Follow Us
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार