चिपी विमानतळाला अजूनही डीजीएसएची परवानगी नाही, कागदाचं विमान उडवणार का ? नितेश राणेंची बोचरी टीका

चिपी विमानतळासाठी अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुले ही 7 तारीख आणली कोठून आणली आहे. हे काय कागदाचं विमान उडवणार आहेत का ? असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना केलाय.

चिपी विमानतळाला अजूनही डीजीएसएची परवानगी नाही, कागदाचं विमान उडवणार का ? नितेश राणेंची बोचरी टीका
VINAYAK RAUR AND NITESH RANE
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Sep 05, 2021 | 6:56 PM

मुंबई : चिपी विमानतळासाठी अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही 7 तारीख कोठून आणली आहे. हे काय कागदाचं विमान उडवणार आहेत का ? असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना केला. तसेच आम्हाला एक बुद्धू खासदार मिळाला आहे, अशी बोचरी टीकादेखील राणे यांनी राऊत यांच्यावर केली. (Nitesh Rane criticizes Vinayak Raut on Chipi airport)

अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही

चिपी विमातळावरून मागील काही दिवसांपासून राणे आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. त्यांच्या या माहितीनंतर कोकणवासी आनंद व्यक्त करत आहेत. मात्र, राऊत यांच्या घोषणेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊत यांचा समाचार घेतलाय. चिपी विमातळावरुन विमानोड्डाण करण्यासाठी अजून डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही सातची तारीख त्यांनी कोठून आणली आहे. ते एकटे राहून कागदाचे विमान उडवणार आहेत का ? आम्हाला एक बुद्धू खासदार मिळाला आहे, असे नितेश राणे म्हणाले.

7 तारखेला मोदी एक्स्प्रेस सुटेल

तसेच पुढे बोलताना राणे यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडलेल्या आगावीच्या रेल्वेगाड्यांबद्दल भाष्य केलं. येत्या 7 तारखेला मोदी एक्स्प्रेस सुटेल. दादरहून 11 डब्यांची ही रेल्वे 1800 प्रवाशांना घेऊन जाईल. ज्यांना पास दिलेले आहेत, तेच या रेल्वेतून प्रवास करतील. शासनाने जे नियम घालून दिले आहेत त्यानुसार नियोजन केले आहे. नारायण राणे यांना भाजपने सन्मानाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलेले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत अशी सर्वांची इच्छा आहे. त्यासाठीच ही मोदी एक्स्प्रेस आहे, असे नितशे राणे म्हणाले.

सरकार पेंग्विनसाठी 15 कोटी रुपये पुरवत आहे

तसेच पुढे बोलताना राणे यांनी मुंबईतील राणी बागेतील पेंग्विनवरील खर्च आणि राज्यातील कोरोना स्थिती या मुद्द्यांवरुन राज्य सरकारला घेरले. राणी बागेत पेंग्विन आणण्याचा प्रकार म्हणजे बालहट्ट पुरवण्याचा प्रयत्न आहे. सरकार पेंग्विनसाठी 15 कोटी रुपये पुरवत आहे. मात्र यांना राज्यातील डॉक्टर्सना देण्यासाठी पैसे नाहीयेत, अशी टीका राणे यांनी केली.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उड्डाण

दरम्यान 7 ऑक्टोबर हा नवरात्रोत्सोवाचा पहिला दिवस आहे. त्या दिवशीपासून आम्ही हवाई वाहतूक सुरू करायला सज्ज आहोत, अशा पद्धतीचं लेखी पत्र कंपनीची विमान वाहतूक करणाऱ्या विभागाने दिलं आहे. त्यामुळे आता विमानतळ शंभर टक्के सुरू करायला हरकत नाही. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विमानतळ सुरू करण्याचं ठरलं होतं. पण नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे. त्या दिवसापासून विमान प्रवास सुरू होणार आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली होती.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

जर दंड टाळायचा असेल तर या तारखेपर्यंत भरा इन्कम टॅक्स रिटर्न

राज ठाकरे म्हणतात, ओबीसींच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव; चंद्रकांतदादा म्हणाले, राज म्हणतात ते बरोबर!

पंचगंगा नदीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची उडी, काहीही झालं तरी आम्ही जलसमाधी घेऊ, रविकांत तुपकर यांची भूमिका

(Nitesh Rane criticizes Vinayak Raut on Chipi airport)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें