पंचगंगा नदीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची उडी, काहीही झालं तरी आम्ही जलसमाधी घेऊ, रविकांत तुपकर यांची भूमिका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिक्रमा यात्रा आता नृसिंहवाडीत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नृसिंहवाडीत पंचगेगत उडी मारुन जलसमाधी घेऊन असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता.

पंचगंगा नदीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची उडी, काहीही झालं तरी आम्ही जलसमाधी घेऊ, रविकांत तुपकर यांची भूमिका
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 4:51 PM

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिक्रमा यात्रा आता नृसिंहवाडीत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नृसिंहवाडीत पंचगेगत उडी मारुन जलसमाधी घेऊन असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानीने जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्ते नृसिंहवाडीत पोहोचले. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात होता. पोलिसांनी काही विपरीत घडू नये यासाठी सर्व बंदोबस्त केला होता. तरीही काही कार्यकर्ते पंचगंगा नदीपात्रात जाण्यात यशस्वी झाले. एका शेतकऱ्याने थेट नदीपात्रात उडी घेतली. पण पोलिसांनी त्याला तातडीने बोटीत घेतलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी आम्ही बातचित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जलसमाधी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मांडली. तसेही मरणार आणि असेही मरणार. त्यापेक्षा हक्कासाठी लढून मरण्यात एक आनंद आहे. आमचं इतिहासात तरी नाव घेतलं जाईल. याशिवाय लढण्याशिवाय हक्काचं मिळणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

रविकांत तुपकर नेमकं काय म्हणाले?

“सरकारने पूरग्रस्तांच्याबाबत आतापर्यंत निर्णय घेणं आवश्यक होतं. या पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. सरकारने झोपेचं सोंग का घेतलं आहे? राजू शेट्टी यांनी पाच दिवसांपासून पदयात्रा सुरु केली आहे. वेळोवेळी इशारे आणि आंदोलने केली आहेत. सरकारला नेमकं किती शेतकऱ्यांना मारायचं आहे? शेतकऱ्यांना जलसमाधी घ्यायलाच लावायची आहे का, सरकारला किती शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे? हा आमचा सवाल आहे. काहीही झालं तरी शेतकरी जलसमाधी घेतीलच. या सरकारला गुपघे टेकायला आम्ही भाग पाडणारच. कितीही पोलीस बंदोबस्त असला तरीही आम्ही जाणार”, अशी भूमिका तुपकर यांनी मांडली.

“पोलिसांच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे. पण राज्य सरकारकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संपर्क करणं गरजेचं आहे. त्यांनी जाआर काढणं जरुरीचं आहे. तोंडी आश्वासनावर आमचा विश्वास राहिलेला नाही. सरकारच्या वतीने जबाबदार माणसाने चर्चा करुन ताबडतोब तोडगा काढणं अपेक्षित होतं. पणा तशा पद्धतीने झालेलं नाही. त्यामुळे आम्ही जलसमाधी आंदोलनावर ठाम आहोत. त्यामुळे त्यांना हे आंदोलन महागात पडणार आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

नाव वगळण्यात आल्यानंतर राजू शेट्टी आक्रमक?

आमदारकीच्या नावाचं काल-परवा चर्चेत आलेला विषय आहे. पूरग्रस्ताबाबत राजू शेट्टी यांनी अगोदरच मोर्चा काढला होता. चळवळीतल्या लोकांचं काम हे प्रस्तापितांना विरोधात लढणं, सामान्यांचा आवाज बुलंद करणं हे चळवळीतल्या लोकांचं काम असतं. ते काम आम्ही सातत्याने करतो. पण विरोधकांमा आमच्यावर टीका करायची आहे. पण त्याची आम्ही चिंता करत नाहीत, असं देखील रविकांत तुपकर म्हणाले.

हेही वाचा :

अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई, जरा धीर धरा, राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो; मुख्यमंत्र्यांनी फटकारले

फटे लेकीन हटे नही, राऊतांनी सांगितलं राहुल गांधींना शिवसेना वाढीचं नेमकं गुपित

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.