AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : आता मुंब्रादेवी म्हणा, भारत हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नव्हे; मंत्री नितेश राणे यांचं विधानN

नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुंब्रा शहराचं नाव बदलण्याची मागणी केली. त्यानंतर भारत हिंदूराष्ट्र असून कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही, असेही वक्तव्य राणेंनी केलं.

Nitesh Rane : आता मुंब्रादेवी म्हणा, भारत हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नव्हे; मंत्री नितेश राणे यांचं विधानN
Nitesh rane news
| Updated on: Aug 16, 2026 | 1:57 PM
Share

मंत्री नितेश राणे पुन्हा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मुंब्र्यातील एका कावड यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी भारत हे हिंदूराष्ट्र असल्याचे म्हटलं. त्यानंतर मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी करा, अशी मागणी देखील नितेश राणे यांनी केली. नितेश राणे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात राणे यांनी शक्तीप्रदर्शन केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंब्र्यात आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानिमित्त नितेश राणे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नितेश राणे यांनी थेट शहराचं नाव बदलण्याची मागणी केली. मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी करण्याची मागणी राणेंनी केली. त्याचबरोबर भारत हिंदूराष्ट्र असून कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही, असे वक्तव्य देखील राणे यांनी केले.

नितेश राणे उपस्थितांशी बोलताना म्हणाले की, ‘बोलता बोलता आलोना मुंब्र्यात. सगळ्यांना वाटत होतं मी इथे येऊ नये. ते विसरले हे मुंब्रा नाही मुंब्रादेवी आहे. आजपासून सर्वांनी मुंब्रादेवी म्हणावं. हे हिंदूराष्ट्रात आहे, कुठल्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये नाही. मी तुम्हाला ताकद द्यायला आलोय. ही महादेवची भूमी आहे. इथे कोणाला घाबरून राहू नका, हा संदेश मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुम्हाला द्यायला आलोय. इथे हिंदुत्ववादी फौजेचं सरकार आहे’.

‘आपल्याकडे कोणी वाईट नजरेने बघू शकत नाही, एवढी ताकद आपल्यात आहे. मुंब्रादेवीत हिंदूंची ताकद वाढली पाहिजे. मुंब्रादेवी काल पण भगवा होता आणि यापुढे पण भगवाच राहील, असेही राणे म्हणाले. परंतु राणे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यावर विरोधक काय प्रतिक्रिया देतील, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात राणेंनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राणेंच्या वक्तव्यावर आव्हाड काय प्रतिक्रिया देतील, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...