Video : राष्ट्रवादी की शिवसेना? गडकरींची चॉईस काय? रॅपिड फायर उत्तर ऐका

Video : राष्ट्रवादी की शिवसेना? गडकरींची चॉईस काय? रॅपिड फायर उत्तर ऐका
नितीन गडकरींची बेधडक उत्तरं
Image Credit source: PNG

नितीन गडकरी हे भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक मोठी राजकीय समीकरणं जुळवली. अनेक राज्यात बहुमत नसतानही सरकारं स्थापन करून दाखवली. गेल्या विधानसभेत महाराष्ट्रात मात्र ही घडी विस्कटली. शिवसेना आणि भाजपची तीन दशकांची चुल वेगळी झाली(Bjp-Shivsena Alliance).

दादासाहेब कारंडे

|

Mar 26, 2022 | 11:55 PM

पुणे : पंतप्रधान मोदींच्या (Pm Modi) मंत्रिमंडळातील एक फायरब्रँड तोफ नेहमी धडाडत असते. ती म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) . दिल्लीच्या राजकारणात दबदबा असणारा महाराष्ट्रातला कणखर नेते गडकरी नेहीमीच धडाडीने बोलततात. त्यांच्या कामचे कौशल्य आणि स्पीड नेहमी चर्चेत असते. गडकरींनी रस्ते विकासात गेल्या काही वर्षात केलेल्या जबरदस्त कामामुळे त्यांचे देशभर कौतुक होतेच. मात्र याचमुळे काहीजण त्यांना रोडकरीही म्हणतात. नितीन गडकरी हे भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक मोठी राजकीय समीकरणं जुळवली. अनेक राज्यात बहुमत नसतानही सरकारं स्थापन करून दाखवली. गेल्या विधानसभेत महाराष्ट्रात मात्र ही घडी विस्कटली. शिवसेना आणि भाजपची तीन दशकांची चुल वेगळी झाली(Bjp-Shivsena Alliance). शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा करत सरकार स्थापन केले. मात्र शिवसेना आणि भाजपला नेहमीच समविचारी पक्ष म्हणून ओळखलं जातं.

गडकरीचं रॅपीड उत्तर काय?

याच पार्श्वभूमिवर नितीन गडकरींना पुण्यात त्यांची चॉईस काय असले? असे एका कार्यक्रमात विचारलं. त्यावेळी नितीन गडकरींनी तसंच धडाकेबाज उत्तर दिलं. सुरूवातील तर मला भाजप आवडतं, असे मिश्कील उत्तर उत्तर दिलं. मी भाजपवाला आहे. त्यामुळे मला भाजपच आवडते, असे गडकरींनी क्षणाचाही विचार न करता सांगितलं. पुढे त्यांना केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्याबद्दल विचारले असात, त्यांनी मी दोघांची काम त्यात समानतेने करतो असे सांगितलं. त्यामुळे हे तुम्ही माझे आभार मानतात, असेही गडकरी म्हणाले. मी कधीच कामात राजाकारण आणत नाही. फक्त निवडणुकीच्या काळात ते पाळतो असेही गडकरी म्हणाले.

आज पु्न्हा बेधडक गडकरी

त्यांना मराठी आणि हिंदीबाबत विचारलं असता, आम्हाला नागपूरला मध्य प्रदेश आणि तर राज्यांची सीमा आहे. हा सर्व आधी नागपूरचा भाग होता आधी त्यामुळे मला हिंदी चांगलं बोलता येत असेही गडकरींनी सांगितलं होतं. तरुणांनाही गडकरींनी यावेळी एक चांगला मसेज दिला. आपण अधुनिकतेकडे वळलं पाहिजे. नव्या गोष्टी करणे ही आपली ताकद आहे. त्यामुळे आपण केलं पाहिजे. असेही गडकरी म्हणाले. तसेच गडकरींनी आर्थिक विकासाबरोबर परिवारही एकत्र राहिला पाहिजे, असे सांगताना एक कविता बोलून दाखवली. जे काम होत नाही ते होणार नाही, असे गडकरी लोकांना थेट तोंडावर सांगतात. तसेच तुम्हाला काम पटलं असेल तर मतं द्या अन्यथा मतं देऊ नका, असेही ते बेधडक सांगतात. याच गडकरींची ही बेधडक उत्तर आज पुन्हा पहायला मिळाली.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांवर पोलिसांची कारवाई, शंभूराज देसाई आणि प्रविण दरेकर काय म्हणाले?

Breaking : दापोलीत हायव्होल्टेज ड्रामा! सोमय्या, राणे आणि कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत राडा; अखेर पोलिसांकडून अटक आणि हद्दपार

‘आमचा घात करायचा आहे का?’ निल सोमय्यांचा संतप्त सवाल, किरीट सोमय्यांचा तासाभरापासून ठिय्या सुरुच

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें