आता तुमच्या गावाचा होणार सर्वांगिण विकास! काय आहे सरकारची ग्रामसमृद्धी योजना? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगिण विकास करण्याचे तसेच राज्यातील गावे सर्वच बाबतीत आदर्श बनविण्याचे माझे स्वप्न आहे. प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी, समृद्ध व सक्षम करण्यासाठी तसेच दत्तक घेतलेली गावे ही आदर्श गावे बनविण्यासाठी जीवनविद्या मिशन, मुंबई आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियान राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

आता तुमच्या गावाचा होणार सर्वांगिण विकास! काय आहे सरकारची ग्रामसमृद्धी योजना? जाणून घ्या सविस्तर
हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 6:45 PM

मुंबई  : महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक (Village adopted) घेऊन त्या गावाचा सर्वांगिण विकास करण्याचे तसेच राज्यातील गावे सर्वच बाबतीत आदर्श बनविण्याचे माझे स्वप्न आहे. प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी, समृद्ध व सक्षम करण्यासाठी तसेच दत्तक घेतलेली गावे ही आदर्श गावे बनविण्यासाठी जीवनविद्या मिशन, मुंबई (Jeevan Vidya Mission Mumbai) आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियान राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ(Hassan Mushrif) यांनी आज सांगितले. थोर समाजसेवक श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन ही समाजातील सर्व स्तरातील अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, स्त्री सन्मान, विद्यार्थी संस्कार अभियान, कार्यशाळा असे विविध प्रकारची कार्य करत आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी जीवनविद्या मिशनने 60 गावे दत्तक घेतली असून, त्यापैकी 20 गावांमध्ये जीवनविद्या मिशनने कार्य सुरू केले आहे. यातील 4-5 गावांमध्ये अतिशय परिणामकारक बदल दिसून आला असल्याने ग्रामविकास विभागाकडे जीवनविद्या मिशनने सादर केलेल्या ग्रामसमृद्धी अभियानाच्या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याचे देखील यावेळी मुश्रीफ यांनी सांगितले.

प्रशिक्षित कार्यकर्ते करणार गावचा विकास

पुढे बोलताना मुश्रीफ यांनी सांगितले की, गावातील भौतिक विकासासाठी सरकारी, निमसरकारी तसेच खासगी संस्था, उद्योग समुहाचे आर्थिक सहकार्य मिळवून जीवनविद्या मिशनचे प्रशिक्षित कार्यकर्ते  विकासकामे करणार आहेत. ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत घरोघरी करण्यात आलेल्या सर्व्हेचा अभ्यास करून तसेच ग्रामपंचायतीसोबत सभा घेऊन गावांचा सर्वांगिण विकास साधण्यावर भर देण्यात येणार आहे. यात हागणदारी मुक्त गाव, प्लास्टिक बंदी, शून्य कचरा मोहीम, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्त्री सन्मान, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, नोकरी किंवा व्यवसाय मागदर्शन, स्वयंरोजगार व रोजगार संधी, शेतकरी वर्गाला संघटित करणे, सरकारी योजना सर्वदूर पोहचविणे व राबविणे, शासकीय लाभ घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, नैसगिक साधनसंपत्तीचा मोजका वापर करण्यास शिकवणे, गाव व्यसनमुक्त करणे, राष्ट्रहित भावना वृद्धींगत करून उत्कृष्ठ नागरिक घडवणे अशा विविध उद्दिष्टांवर भर देण्यात येणार आहे.

विकासाचा खर्च संस्था आणि लोकसहभागातून उभारणार

ग्रामसमृद्धीचे कार्य करण्यासाठी जीवनविद्या मिशन संस्थेला शासनाची सहयोगी मागदर्शक संस्था म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. मात्र जीवनविद्या मिशन, मुंबई या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रामसमृद्धी अभियानासाठी येणारा खर्च सरकारी योजनेतून करण्यात येणार नसून, संस्थेमार्फत किंवा लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. या अभियानामुळे गावातील प्रत्येकाचा मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि शारिरीक स्तर उंचावण्यास मदत होईल अशी अपेक्षा देखील यावेळी मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Hijab : देशामध्ये कुणी काय खायचं? कसे कपडे वापरायचे? हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? मलिकांचा थेट मोदींना सवाल

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Photo Story: हिजाबचा हिसाब 2024ला करणार, कर्नाटकातील हिजाब वादाचे सोलापुरात पडसाद; चक्काजाम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.