AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर मोठा हल्ला, म्हणाले, आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून..

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर काल मोठा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. यादरम्यान नक्की काय घडले हे सांगताना लक्ष्मण हाके दिसले. लक्ष्मण हाके यांनी थेट जरांगेंना अटक करा, अशी मागणी केली.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर मोठा हल्ला, म्हणाले, आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून..
Laxman Hake
| Updated on: Sep 12, 2026 | 9:33 AM
Share

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीन ते चार तरूणांनी हॉटेलमध्ये हाकेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या न्यायासाठी हाके यांनीही आंदोलन केले. हल्ल्यानंतर बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ओबीसीचा आवाज दाबण्याचा हा हल्ल्याच्या माध्यमातून प्रयत्न होता. हा माझ्यावर झालेला अकरावा हल्ला होता आणि तो भ्याड हल्ला होता हे सगळे कार्यकर्ते जरांगेचे होते. लक्ष्मण हाकेचा जीव गेला तरी आम्ही ओबीसीचा आवाज थांबवणार नाही. ओबीसीच्या नेत्यांवर हल्ले करून शिवीगाळ करून तू आरक्षण घेऊ शकत नाहीत. पोलीस बंदोबस्त असताना देखील हे आमच्यावर हल्ले करतायेत म्हणजे हे कायद्याला मानत नाहीत.

कालचा हल्ला म्हणजे माझं जीव घेण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे फडणवीस यांनी भुताला आवरा… तुमच्या मानगुटीवर बसलेले भूत आहे या तीनपाटाला उचला आणि आत टाका तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा असे म्हणत जरांगे वर टीका केली. यासोबतच त्यांनी जरांगे यांना अटक करण्याची मागणी देखील केली आहेत.

पुढे लक्ष्मण हाके यांनी म्हटले, जेवालय थांबलो होतो, आमच्यासोबत 10-12 पोलिस कर्माचारी होती. पहिल्या येऊन एकजण व्हिडीओ शूट करत होता आणि दुसरे काही लोक हुज्जत घालत होते. हॉटेलमध्ये दार लावून आम्ही जेवलो, तो भ्याड हल्ला होता. दारू पिऊन ते आले होते. मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते होते. भुजबळांवर तर एक जन दगड घेऊन गेला होता.

पोलिस असूनही हे ऐकत नाहीत. जरांगे यांना माझा सल्ला आहे की, तू मुंबईत नको तर दिल्लीत जा… तू निझामच्या देशात नाही, इथे संविधानाचे पालक करावे लागते. ह्याला अटक करा फडणवीस याला अटक करा. हाके यांनी नक्की काय घडले होते, हे सांगितले आहे. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झाल्याने पोलिस अधिक सर्तक झाले आहेत.

Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन