AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Maha Elgar Sabha : मराठा समाजाला हात जोडून नम्र विनंती.., नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे? जरांगे पाटलांवर हल्लाबोल

आज बीडमध्ये आयोजित ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेत बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, या सभेला सर्व प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती आहे.

OBC Maha Elgar Sabha : मराठा समाजाला हात जोडून नम्र विनंती.., नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे? जरांगे पाटलांवर हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2025 | 10:13 PM
Share

हैदराबाद गॅझेटला ओबीसी समाजामधून विरोध होत आहे, हे गॅझेट रद्द करण्याची मागणी ओबीसी समाजाची आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी भूमिका समाजाची आहे, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे? 

आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जातीचे लोक एकत्र नांदत होते. दोन वर्षांपासून एका व्यक्तीने एका प्रवृत्तीने मी समाज म्हणत नाही, ओबीसी, एससी, एसटी आणि मराठा समाजात अंतर पाडलं. हे अंतर कुठून पडलं? आज माझी मराठा समाजाला नम्र हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त दोन समाजात अंतर पडलेले नाही. तर तुमच्याशीही तो दगाफटका करत आहे. उदाहरणासह सांगतो, १३ कोटी जनतेसमोर यावं,  खरा फायदा मराठ्यांचा ओबीसीत नाही, त्यांचा फायदा ईडब्ल्यूएसमध्ये आहे. ओबीसीत का यायचं आहे तर मूठभर लोकांना सरपंचापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत जायचं आहे. यांना पेटवायचं आहे, असा हल्लाबोल यांनी धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, यांनी  मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं आणि माझं काहीच सोडलं नाही. मला तर कधीपासून पाडीनच म्हणतो. भुजबळ साहेबांनाही म्हणतो, पाडीतोच. अरे १ लाख ४२ हजार मतांनी निवडून आलो आहे, पाडीतो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतो, आज आपल्या ओबीसींचं आरक्षण न्याय हक्कासाठी हा एल्गार मोर्चा आहे. आपल्या हक्काचं आरक्षण कुणाला देऊ द्यायचं नाही. किती डोकेबाज माणूस समजायचं. दसरा संपल्यावर म्हणतो धनगरांचं ९४ चं आरक्षण काढा. याला जीआर तरी कळतो का? वंजाऱ्याचंही आरक्षण काढतो. पण आज शपथ घ्या. आपसातील तंटे बाजूला ठेवा. नगर पंचायत, जिल्हा परिषदा या निवडणुका आहेत, असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात.
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?.
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?.
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट.
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती.
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक.
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान.
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका.
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड.
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?.