AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज ( सोमवार १० मार्च रोजी ) विधीमंडळात सादर करण्यात आला असून राज्यातील नवीन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पात अनेक लोकोपयोगी घोषणा करण्यात आल्या असून मराठी भाषेचा गौरवार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात दर्जा दिल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन' म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा
| Updated on: Mar 10, 2025 | 3:40 PM
Share

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार अशी घोषणा अर्थ मंत्री अजितदादा यांनी आज अधिवेशनात केली आहे, राज्याचा अर्थसंकल्प २०२५ मांडताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले महाराष्ट्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहोत. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवून दिला आहे असे अजितदादा यावेळी म्हणाले.

भावफुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळुन तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्दी अमृत ओतून…

अशा शब्दात अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेचा गौरव करीत मायमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मांडले. आपल्या मायमराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाष‍िकांच्यावतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो असेही अजितदादा पवार यावेळी म्हणाले.

यापुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’

यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान टअभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार आहेत अशीही माहीती यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.