Omraje Nimbalkar : ‘अरे खाली बसा, तुम्हाला काय…’ खुर्च्या रिकाम्या दिसताच ओमराजेंचे फर्मान, भर सभेत पुढे असं घडलं की…

या सभेत नेत्याने आपल्याच कार्यकर्त्यांना असा आदेश सोडला की सगळीकडे एकच हशा पिकला. विशेष म्हणजे हा आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आहेत.

Omraje Nimbalkar : अरे खाली बसा, तुम्हाला काय... खुर्च्या रिकाम्या दिसताच ओमराजेंचे फर्मान, भर सभेत पुढे असं घडलं की...
omraje nimbalkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 10:47 PM

Omraje Nimbalkar : नेता आणि सभा यांच्यातील नातं खूपच खास असतं. सभा घ्यायची म्हटलं की लोकांची गर्दी असावी, अशी अपेक्षा ही नेत्याची असतेच. जेवढी जास्त गर्दी, तेवढा नेत्यामध्ये जास्त जोश भरतो. मंचासमोरचे मैदान, खुर्च्या भरगच्च असल्या की नेत्याला भाषण करायला उत्साह येतो. म्हणूनच साहेबांच्या सभेला गर्दी असावी, यासाठी कार्यकर्तेही कायम प्रयत्नरत असतात. दरम्यान, अशाच एका सभेची आणि त्या सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. या सभेत नेत्याने आपल्याच कार्यकर्त्यांना असा आदेश सोडला की सगळीकडे एकच हशा पिकला. विशेष म्हणजे हा आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आहेत.

कार्यकर्ता-नेता नातं असतं तरी काय भाऊ?

नेता आणि नेत्याचे कार्यकर्ते हे नातं फार वेगळं असतं. जिथं नेता तिथे कार्यकर्ता हे समीकरण ठरलेलंच. आपल्या नेत्याला अडचण होऊ नये म्हणून अनेक कार्यकर्ते राब राब राबतात. काही नेते आपल्यासोबतच आपल्या कार्यकर्त्यांचेही भले करून घेतात. तर काही दुर्दैवी कार्यकर्त्यांच्या नशिबी मात्र कायम संघर्षच येतो. काही बिचारे कार्यकर्ते कायम उपेक्षित आणि वंचितच राहतात. पण काहीही असो नेते मंडळींना मात्र आपला कार्यकर्ता हा कायम आपल्या आजूबाजूलाच फिरता असावा, असं नेहमी वाटतं. नेतेमंडळी आपल्या कार्यकर्त्यांवर हक्क मात्र नेहमी दाखवत असतात. असाच हक्क धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर दाखवला आहे. भाषणात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ऑर्डर सोडलीय. त्यानंतर सभेत एकच हशा पिकला.

धाराशीवमध्ये नेमकं काय घडलं?

धाराशीव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १५१ फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषण झाली. याच कार्यक्रमात ओमराजे निंबाळकर यांनीही भाषण केले. परंतु काही कार्यकर्ते खुर्चीवर न बसता उभे होते. हीच बाब खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनील लगेच आपल्या मिश्कील शैलीत कार्यकर्त्यांना “खाली बसा, खुर्च्या पोळायला लागल्या का?” असं म्हणत बसण्यास सांगितलं. खासदार ओमराजेंच्या या मिश्कील वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. ओमराजेंच्या आदेशानंतर लगेच कार्यकर्ते खुर्च्यावर बसले. ओमराजेंनी कार्यकर्त्यांना दिलेल्या या आदेशाची आणि सभेत उडालेल्या हास्यकल्लोळाची सगळीकडे चर्चा होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us