वैकुंठ एकादशी निमित्त श्रीकांत शिंदे यांनी घेतले तिरूपती बालाजींचे दर्शन
वैकुंठ एकादशी निमित्त श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी पहाटे तिरूपती देवस्थानाला भेट देत बालाचींचे दर्शन घेतले. पायी चालत त्यांनी भगवान बालाजींचे दर्शन घेतले. बालाजीचे दर्शन घेत सर्वांना सुख समाधानाचे, आनंदाचे आणि निरोगी आयुष्य लाभू दे अशी केली प्रार्थना.

गिरीश गायकवाड, मुंबई : आज वैकुठ एकादशी आहे. सर्व एकादशींमध्ये वैकुंठ एकादशीला (Vaikuntha Ekadashi 2023) विशेष महत्त्व आहे. वैकुंठ एकादशी निमित्त श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी पहाटे तिरूपती देवस्थानाला भेट देत बालाचींचे दर्शन घेतले. पायी चालत त्यांनी भगवान बालाजींचे दर्शन घेतले. बालाजीचे दर्शन घेत सर्वांना सुख समाधानाचे, आनंदाचे आणि निरोगी आयुष्य लाभू दे अशी केली प्रार्थना. यावेळी खासदार राम मोहन नायडूही त्यांच्या सोबत होते. तिरुपती देवस्थान मंदिर परिसरात स्थानिकांसमवेत साधला संवाद. सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्यासह पत्नी वृषाली, मुलगा रुद्रांश उपस्थित होते.
वैकुंठ एकादशीचे महत्त्व
यावर्षी 23 डिसेंबर 2023 रोजी वैकुंठ एकादशी साजरी केली जात आहे. वैष्णव पंथाचे लोक आज म्हणजेच 23 डिसेंबर 2023 शनिवार साजरे करत आहेत. पंचांगानुसार, एकादशी तिथी 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 08:16 पासून सुरू होऊन 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 07:11 पर्यंत होती. या दिवशी व्रत आणि विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करणे खूप फायदेशीर आहे. यासोबतच वैकुंठ एकादशीची कथाही वाचावी. वैकुंठ एकादशी व्रताच्या पारणाची वेळ 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7:11 ते 9:15 पर्यंत असेल.
वैकुंठ एकादशी व्रत उपासना पद्धत
वैकुंठ एकादशीच्या दिवशी स्नान करून उपवास करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर देवाला गंगाजलाने अभिषेक करावा. यानंतर तुळशीची डाळ, तीळ, फुले, पंचामृत यांनी विधीनुसार भगवान नारायणाची पूजा करावी. दिवसभर अन्न किंवा पाणी घेऊ नका. वैकुंठ एकादशीचे व्रत पाण्याविना ठेवावे. जर हे शक्य नसेल तर संध्याकाळी दिवा दान केल्यावर फळ घेऊ शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, दान करा आणि नंतर पारण करा. हे व्रत केल्याने माणसाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि वैकुंठधाममध्ये स्थान मिळते. म्हणून वैकुंठ एकादशीला मुक्कोटी एकादशी असेही म्हणतात. तसेच हे व्रत करणाऱ्यांवर भगवान विष्णूची कृपा सदैव राहते.
