AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओपीडी, आयपीडी, ऑपरेशन पुन्हा सुरू होणार, अखेर डॉक्टरांचा संप मागे

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एमएआरडीकडून निवासी डॉक्टरांचा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

ओपीडी, आयपीडी, ऑपरेशन पुन्हा सुरू होणार, अखेर डॉक्टरांचा संप मागे
डॉक्टरांचा संप मागे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 06, 2026 | 7:48 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एमएआरडीकडून निवासी डॉक्टरांचा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. डॉक्टरांनी संप मागे घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा नियमितपणे ओपीडी, आयपीडी आणि नियोजित शस्त्रक्रिया, तसेच प्रयोगशाळा सेवा, फिव्हर ओपीडी आणि शौक्षणिक उपक्रम पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र जरी संप मागे घेतला असला तरी देखील सीसीएमपी पात्रता असलेल्या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला अजूनही एमएआरडीचा विरोध कायम आहे.  याच विरोधात आज निवासी डॉक्टरांकडून संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर  सरकार आणि MARD प्रतिनिधींमध्ये चर्चा करून तोडगा काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर आता एमएआरडीकडून संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा नियमितपणे ओपीडी, आयपीडी आणि नियोजित शस्त्रक्रिया, तसेच प्रयोगशाळा सेवा, फिव्हर ओपीडी आणि शौक्षणिक उपक्रम पुन्हा सुरू होणार आहेत. डॉक्टरांनी संप मागे घेतल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान  न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखत जरी संप मागे घेतला असला तरी, इतर कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा एमएआरडीकडून देण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं? 

उच्च न्यायालयाने संपाच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांची बाजू मांडणाऱ्या वकिलांची देखील कानउघडणी केली होती. रुग्णांचे हाल होत आहेत, हे तुम्हाला छान वाटतं का? असा सवाल न्यायालयाने संपांची घोषणा केलेल्या डॉक्टरांना विचारला होता. तसेच तुम्ही संप मागे घ्या, तुम्ही जर संप मागे घेतला तर आम्ही तुमची बाजू लवकरात लवकर ऐकू असंही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं होतं. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. डॉक्टरांनी आपला संप मागे घेतल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू होणार आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी