Namita Mundada | ‘Beed जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री, पोलिसांचा धाक राहिला नाही’

बीड (Beed) जिल्ह्यातील महिला सुरक्षित नसून अवैधरित्या आणि खुलेआम दारूविक्री (Liquor) होत आहे. पोलिसांचाही धाक राहिलेला नसल्याचा आरोप आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Mar 07, 2022 | 5:36 PM

बीड (Beed) जिल्ह्यातील महिला सुरक्षित नसून अवैधरित्या आणि खुलेआम दारूविक्री (Liquor) होत आहे. पोलिसांचाही धाक राहिलेला नसल्याचा आरोप आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, की माझ्याबरोबर एक आठवड्यापूर्वी एक घटना झाली होती. त्याचे पुढे काही झाले नाही. बीड जिल्ह्यात पोलिसांचा काहीही धाक नाही. अवैधरित्या दारूविक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यात काही दारू प्यायलेल्या लोकांनी माझ्यासोबत फोटो काढायचे म्हणून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी आज लक्षवेधी मांडल्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना रजेवर पाठवले आणि पोलीस निरीक्षकास निलंबित केले आहे. जर एका आमदारासोबत अशी घटना घडत असेल, तर सर्वसामान्य महिलांचे काय, कायदा आणि सुव्यवस्थेकडे सरकारचे लक्ष नाही, अशी टीका आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें