AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटातील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब? व्हीप उडवून लावला… सहा खासदारांची दांडी; दिल्लीतून आली मोठी बातमी

Shiv Sena Operation Tiger: ठाकरे गटाताली फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील पक्षाची बैठक सुरू होऊन आता बराच वेळ झाला तरी त्या सहा खासदारांनी दांडी मारल्याचे उघड झाले आहे.

ठाकरे गटातील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब? व्हीप उडवून लावला... सहा खासदारांची दांडी; दिल्लीतून आली मोठी बातमी
6 खासदार फुटले... व्हीप उडवून लावलाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 18, 2026 | 11:38 AM
Share

Shiv Sena Operation Tiger: दिल्लीतून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे सेनेत उभी फूट पडल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बंडखोर सहा खासदारांनी व्हीप उडवून लावला आहे. कालपासून ज्या खासदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. ते उद्धव सेनेच्या खासदारांच्या बैठकीला अद्यापही पोहचलेले नाही. गेली दहा मिनिटे उलटूनही या बैठकीला त्यातील एकानेही हजेरी लावलेली नाही. त्यांनी पक्षाचा व्हीपच उडवून लावला आहे. त्यामुळे आता या खासदारांविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

बैठकीला कोण कोण उपस्थित?

आज 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संसदेच्या कार्यालयात पक्षाची बैठक बोलावली होती. कालच त्यासाठी सर्व खासदारांना व्हिप बजावण्यात आला होता. आज बैठक सुरू झाली तेव्हा राज्यसभेतील एक आणि लोकसभेतील तीन खासदार या बैठकीला उपस्थित होते.

संजय राऊत

अनिल देसाई

अरविंद सावंत

राजाभाऊ वाजे

ठाकरेंचे 6 खासदार फुटले

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आज पक्षाने व्हिप बजावून सुद्धा हे खासदार अनुपस्थित राहिले.

संजय दिना पाटील

संजय देशमुख

संजय (बंडू) जाधव

ओमराजे निंबाळकर

संजय वाकचौरे

नागेश पाटील आष्टीकर

फुटीर खासदारांवर अपात्रतेची कारवाई?

आता ठाकरे सेनेकडून या अनुपस्थित खासदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. या सहा खासदारांनी बैठकीला दांडी मारल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या गैरहजर खासदारांवर आता उद्धव सेना अपात्रतेची कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. तर काहींच्या मते अगोदर या खासदारांना अगोदर पक्ष कारणे दाखवा नोटीस बाजावेल आणि नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

6 खासदारांचा शिंदे सेनेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा

ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे सेनेचा व्हीप ही त्यांनी जुमानला नाही. स्वतंत्र गट स्थापन करण्याचा अगोदरच लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज केल्याने व्हीप लागू होत नसल्याचा दावा कालच बंडखोरांकडून करण्यात आला होता. 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाला मंजूरी मिळाल्याने त्यांचा शिंदे सेनेतील विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी