AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Tigher : ठाकरेंना वाटतं येणारा काळ चांगला, तर त्यांना शुभेच्छा, भाजपच्या बड्या नेत्याची उपरोधिक प्रतिक्रिया

Operation Tigher : उद्धव ठाकरे यांना येणारा काळ चांगला वाटत असेल, तर त्यांना शुभेच्छा अशी उपरोधिक प्रतिक्रिया भाजपं नेत्याने दिली आहे. खासदार निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहेत. शपथा वगैरे हा बालिशपणा वाटतोय,अशा शब्दात भाजप नेत्याने टीका केली.

Operation Tigher : ठाकरेंना वाटतं येणारा काळ चांगला, तर त्यांना शुभेच्छा, भाजपच्या बड्या नेत्याची उपरोधिक प्रतिक्रिया
uddhav Thackeray
| Updated on: Jun 16, 2026 | 2:06 PM
Share

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. या ऑपरेशन टायगरचा उद्देश उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडणं आहे. उद्धव ठाकरे गटाकडे 9 खासदार आहेत. हे नऊ खासदार नाराज असून पक्षात अस्वस्थ असल्याची बाहेर चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांची नाराजी असल्याचं हे खासदार खासगीत बोलतात अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला चार खासदार ऑनलाइन हजर होते, असं सांगण्यात येतय. नऊ पैकी एका खासदाराने एकनाथ शिंदे शिवसेनेच्या केंद्रातल्या मंत्र्याची भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातला हा नाराज खासदारांचा गट तृणमुल काँग्रेस प्रमाणे स्वतंत्र गट स्थापन करणार अशा चर्चा सुरु झाल्या.

उद्धव ठाकरे हे आपल्या खासदारांचं संरक्षण करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेण्यांमध्ये ते अपयशी ठरले आहेत. खासदारांच्या तक्रारी पाहता उद्धव ठाकरे यांची दखल घेत नाहीत. आदित्य ठाकरेंशी त्यांचा समन्वय नाही आणि एकंदरीत आपल्या मतदार संघाचे काय होणार या विवंचनेत ते आहेत” असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. “ऑपरेशन टायगर होत असेल तर खासदारांची भावना सुद्धा या ना त्या मार्गाने समोर येईल आपल्याला वाट पाहावी लागेल” असं दरेकर म्हणाले.

शपथा वगैरे हा बालिशपणा वाटतोय

“दोघांची दोन मतं दिसत आहेत, खासदार निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहेत. शपथा वगैरे हा बालिशपणा वाटतोय, त्यांच्यात समन्वय, ताळमेळ नाहीये. ठाकरे म्हणतात जायचंय तर जाऊ द्या पण राऊत वेगळं बोलतात” असं प्रवीण दरेकर म्हणाले. “संजय राऊत यांचा आत्मविश्वास टोकाला, ठाकरेंना वाटत असेल की येणारा काळ चांगला तर त्यांना शुभेच्छा” अशी उपरोधिक प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

काँग्रेसचा आत्मविश्वास हरपला आहे

“काँग्रेसचा आत्मविश्वास हरपला आहे. नेत्यांमध्ये आत्मविश्वास उरला नाहीये. हर्षवर्धन सपकाळांऐवढे उत्तम प्रदेशाध्यक्ष आत्तापर्यंत काँग्रेसला मिळाले नसतील, ते राहतील यातच आमचा फायदा आहे. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही. काँग्रेसमुक्त राज्य अशी त्यांची भूमिका आहे” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं