AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनुसूची जाती आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणार, आता जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलन, आनंदराज आंबेडकर यांची घोषणा

मुंबईतील आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. मात्र, आता जिल्ह्याजिल्ह्यात अशी आंदोलन सुरू करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अनुसूची जाती आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणार, आता जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलन, आनंदराज आंबेडकर यांची घोषणा
anandraj ambedkar
| Updated on: Jun 30, 2026 | 7:09 PM
Share

अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाला सर्वाच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे. या विरोधात आता अनुसूचित जातींच्या आरक्षणाला झळ बसणार असल्याने त्याला विरोध करण्यासाठी आज मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. या आंदोलनामुळे सरकारला जाग यायला हवी यासाठी जिल्ह्या – जिल्ह्यात अशी आंदोलने होतील असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याने मुंबईतील आंदोलन मागे घेत असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

58 -59 जातींना अंगावर घेऊ नका

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी आज सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला सोबत आहेत. उद्या किंवा परवा ही बैठक होईल. त्यामुळे अर्धी लढाई आपण जिंकलेलो आहोत. सरकार आश्वासन देतंय, पण जिल्हा जिल्ह्यात ही आंदोलने झाली पाहिजेत 59 जाती आता शांत बसायला तयार नाहीत, आज आमच्यासोबत सगळा समाज आहे.आम्ही सांगितलं की तुम्ही या 58 -59 जातींना अंगावर घेऊ नका, हे उपवर्गीकरण आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही असेही आंबेडकर म्हणाले.

आज आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याची दखल संपूर्ण विधीमंडळाने घेतली आहे आणि याची झळ लागलेली आहे. आता आपण हा लढा थांबवायचा नाही. प्रत्येक जिल्ह्यात ही आंदोलन करायची असेही यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले. आपण मुंबईमध्ये एकत्रित आलात आता. जिल्ह्या- जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरु ठेवा आणि हे सगळं आता आपल्याला एकत्रित करायचे आहे आणि ही एकी टिकवण्याचे काम आपले आहे.आपल्याला निधी आणि काही ठिकाणी आरक्षण मिळत नाही. त्यासाठी आता लढायचं आहे आणि पुढील काम करायचे आहे. मुंबईतील आंदोलन संपवत आहोत. या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचे धन्यवाद असेही ते म्हणाले.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ