AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंदियात महिला शेतकऱ्याने फुलविली सेंद्रिय बागायती शेती, देशी-विदेशी भाजीपाला लागवड

बहुधा आवड म्हणून नव्हे तर नाईलाजाने ग्रामीण भागात महिला कृषी क्षेत्राकडे वळतायत. मात्र गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या नीता ओंकार लांजेवार या उच्च शिक्षण घेऊनही वैशिष्ट्यपूर्ण शेती करतात, खरं तर हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे. कशा पद्धतीने त्या शेती करतात, ते जाणून घेऊयात.

गोंदियात महिला शेतकऱ्याने फुलविली सेंद्रिय बागायती शेती, देशी-विदेशी भाजीपाला लागवड
gondia women
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 4:27 PM
Share

गोंदिया :- प्रत्येकाला आवडीनुसार विशिष्ट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते, यासाठी मनुष्य जीवाचे रान करतो. हल्ली महिलांनी सुद्धाप्रत्येक क्षेत्रात उडी घेतलीय. बहुधा आवड म्हणून नव्हे तर नाईलाजाने ग्रामीण भागात महिला कृषी क्षेत्राकडे वळतायत. मात्र गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या नीता ओंकार लांजेवार या उच्च शिक्षण घेऊनही वैशिष्ट्यपूर्ण शेती करतात, खरं तर हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे. कशा पद्धतीने त्या शेती करतात, ते जाणून घेऊयात.

ब्राह्मणटोला शिवारात एक एकर शेती विकत घेतली

अर्जुनी मोरगावच्या नीता लांजेवार यांनी ब्राह्मणटोला शिवारात एक एकर शेती विकत घेतली. गोंदिया जिल्हा धानशेतीचा आहे. सध्या उत्पादन वाढीसाठी शेतात रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. यामुळे दैनंदिन आहार हेसुद्धा विषयुक्त झालेय. सत्त्वहीन आहाराची सवय माणसाला जडत आहे.

सेंद्रिय शेतीच करणारे बोटावर मोजण्याइतके शेतकरी

हल्ली अन्नधान्य, भाजीपाला, फळे हे शुद्ध असतील, यावर विश्वासार्हता राहिली नाही. उत्पादन आणि त्यातून कमी उत्पन्न झाले तरी चालेल, पण सेंद्रिय शेतीच करणार असे बोटावर मोजण्याइतके शेतकरी उरले आहेत. त्यातील एक म्हणजे नीता लांजेवार आहेत. नीता यांनी पद्धतशीर नियोजन केले आणि त्यांनी शेतात ठिबक सिंचनाची सुविधा केली. शेतात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग केला.

या ग्रुपवर आज उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची नोंद

त्यांनी झुकिनी आणि इतर विदेशी पिकांची लागवड केली. झुकिनी ही विदेशी भाजी असल्याने स्थानिकांमध्ये तिचा स्वाद नव्हता. पण हळूहळू प्रचंड मागणी वाढली. त्यांनी एक एकर क्षेत्रात मिश्र भाजीपाला, फळबाग आणि फुलशेतीचा अत्यंत सुंदर संयोग साधला. सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेला भाजीपाला पसंत करणारी अनेक लोक आहेत. अशा लोकांचे मोबाईल क्रमांक घेऊन एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर आज उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची नोंद केली जाते.

व्हाॅट्सॲप धारक मोबाईलवर हव्या असलेल्या भाजीची नोंदणी करतात

इच्छुक व्हाॅट्सॲप धारक मोबाईलवर हव्या असलेल्या भाजीची नोंदणी करतात. जितकी नोंदणी झाली तेवढ्याच भाजीची तोडणी केली जाते. तेवढी भाजी पॅकिंग करून दिली जाते. शेतमाल शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो. तर लोकांना विषमुक्त भाजी उपलब्ध करून देण्याचा मनोमन समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे. नीताताईंसारख्या इतरही महीलांही शेतीकडे वळल्या तर शेतीमध्येसुद्धा महिलासुद्धा क्रांती केल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित बातम्या

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो दराची लाली उतरली, निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु

लाल चिखल, दर पडल्यानं रस्त्याकडेला टोमॅटोचा सडा, शेतकऱ्यांना हमीभाव कधी मिळणार?

Organic horticulture cultivated by women farmers in Gondia, cultivation of native and foreign vegetables

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.