AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar Swine Flue : गिरगाव आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू, उपचारानंतर प्रकृती स्वस्थ

सध्या वसतिगृहात 228 मुलं-मुली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून खबरदारी म्हणून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बंदी केली असून बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात आहे.

Palghar Swine Flue : गिरगाव आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू, उपचारानंतर प्रकृती स्वस्थ
गिरगाव आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यूImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 19, 2022 | 10:20 PM
Share

पालघर : तलासरी झाई येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी झिका आणि स्वाईन फ्ल्यू झाल्याचे उघड झाले असताना आता गिरगाव आश्रम शाळे (Girgaon Ashram School)तील 15 विद्यार्थ्यां (Students)ना स्वाईन फ्ल्यू (Swine Flue) बाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या वसतिगृहात 228 मुलं-मुली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून खबरदारी म्हणून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बंदी केली असून बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात आहे.

खबरदारी म्हणून वसतिगृहातच विलगीकरणात ठेवलंय विद्यार्थ्यांना

तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील एकात्मिक आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील 22 विद्यार्थ्यांची आजारी असल्याने तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 14 मुली व एक मुलगा अशा विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे तपासणीअंती समोर आले होते. तर तर 3 विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि उर्वरित व्हायरल इन्फेक्शने आजारी असल्याचे समोर आले होते. सध्या स्वाईन फ्ल्यू झालेले विद्यार्थी उपचारानंतर स्वस्थ असून खबरदारी म्हणून त्यांना वसतिगृहातच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.

झाई आश्रमशाळेतील सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू

झाई आश्रम शाळेत सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू ची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली. झाई आश्रम शाळेतील एका सात वर्षीय विद्यार्थ्याला झीकाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर गव्हर्मेंट इंडियन मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअरच्या डेव्हलपमेंट ऑफ सेंट्रल मल्टी डिसिप्लिनरी टीमने या आश्रम शाळेत आरोग्य तपासणी केली. त्यात झाई आश्रम शाळेतील आणखी सात विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घाई आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. (15 students of Girgaon Ashram School Palghar affected by swine flu)

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.