AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola Murder : अकोल्यात रात्री युवकाची हत्या, आधी चाकूने भोसकले नंतर दगडाने ठेचले

विनोद टोंबरे या युवकाची हत्या करण्यात आली. सुरुवातीला विनोदला चाकूने भोसकण्यात आलं. त्यानंतर दगडानं ठेचून ही हत्या करण्यात आली.

Akola Murder : अकोल्यात रात्री युवकाची हत्या, आधी चाकूने भोसकले नंतर दगडाने ठेचले
आधी चाकूने भोसकले नंतर दगडाने ठेचलेImage Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 13, 2022 | 11:51 PM
Share

अकोला : अकोला शहरात रात्री थरारक घटना घडली. एका युवकाची हत्या करण्यात आली. सुरुवातीला त्याला चाकूने भोसकण्यात आले. त्यानंतर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. विनोद टोंबरे असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. रात्रीच्या घटनेमुळं पोलीस सतर्क झाले आहेत. शहरातल्या न्यू तापडिया नगरमधल्या गणपती मंदिरासमोर (Ganapati Temple) ही घटना घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. सिव्हिल लाईन्स (Civil Lines) पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हत्या झालेला युवक हा पंचशीलनगर (Panchsheel Nagar) येथील रहिवासी आहे.

नेमकं काय घडलं

जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  विनोद टोंबरे या युवकाची हत्या करण्यात आली. सुरुवातीला विनोदला चाकूने भोसकण्यात आलं. त्यानंतर दगडानं ठेचून ही हत्या करण्यात आली. ही घटना गणपती मंदिरासमोर घडली. सिव्हिल लाईन्स पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकांमध्ये भीतीचं वातावरण

या हत्येच्या घटनेनं परिसर हादरला आहे. लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. कोणत्या कारणानं ही हत्या झाली, हे सांगण्याची हिंमतदेखील लोकांमध्ये दिसून येत नाही. याचा अर्थ आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जातं. तपासानंतर हत्या करण्याचे कारण काय, ही हत्या कोणी केली हे समोर येईल.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती