AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mira Bhayander Murder : 20 वर्षांपूर्वीच्या हत्याकांडात आरोपीला अमेरिकेतून अटक; काशिमीरा पोलिसांची कामगिरी

मूळची अमेरिकेची रहिवाशी असलेल्या 33 वर्षीय लियोना जी स्विडेस यांचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा काशिमीराच्या हद्दीत आढळून आला होता. 2003 साली ही घटना घडली होती. त्यावेळी काशिमीरा पोलिसांनी हत्येच्या गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याची वेळीच उकल करून आरोपी प्रगनेश महेंद्र कुमार देसाई, विपुल मनुभाई पटेल, अल्ताफ गफुर पटेल, फारुख बनारसी या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

Mira Bhayander Murder : 20 वर्षांपूर्वीच्या हत्याकांडात आरोपीला अमेरिकेतून अटक; काशिमीरा पोलिसांची कामगिरी
20 वर्षांपूर्वीच्या हत्याकांडात आरोपीला अमेरिकेतून अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 12:29 AM
Share

मिरा भाईंदर : जवळपास वीस वर्षापूर्वी घडलेल्या हत्याकांडातील आरोपीला मीरा-भाईंदरमधील काशिमीरा पोलिसांनी अमेरिके (America)मधून अटक (Arrest) केली. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांनी आरोपीला दुसऱ्यांदा अटक करण्याची कामगिरी पूर्णत्वास नेली. 20 वर्षांपूर्वी एका परदेशी महिलेची हत्या (Murder) झाली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी अमेरिकेत जाऊन अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. विपुल मनुभाई पटेल असे युरोपातून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 2004 मध्ये प्रथम या हत्याकांडातून निर्दोषमुक्त झाल्यानंतर विपुल पटेल हा अमेरिकेत गेला होता.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सापडला होता महिलेचा मृतदेह

मूळची अमेरिकेची रहिवाशी असलेल्या 33 वर्षीय लियोना जी स्विडेस यांचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा काशिमीराच्या हद्दीत आढळून आला होता. 2003 साली ही घटना घडली होती. त्यावेळी काशिमीरा पोलिसांनी हत्येच्या गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याची वेळीच उकल करून आरोपी प्रगनेश महेंद्र कुमार देसाई, विपुल मनुभाई पटेल, अल्ताफ गफुर पटेल, फारुख बनारसी या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करून परदेशी महिलेच्या हत्येप्रकरणी मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. परंतु या प्रकरणाचा खटला न्यायालयात उभा राहिला, त्यावेळी दोन आरोपींची निर्दोष सुटका झाली. 2004 साली न्यायालयाने साक्षीचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्याचदरम्यान निकाल देताना प्रगनेश महेंद्र कुमार देसाई आणि विपुल मनुभाई पटेल या दोघा आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते.

दोघांच्या दोषमुक्ततेला सरकारकडून हायकोर्टात आव्हान

कनिष्ठ न्यायालयाने दोन आरोपींना निर्दोष ठरवल्यानंतर सरकारने 4 ऑक्टोबर 2004 रोजी उच्च न्यायालयात धाव घेऊन अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने दोन्ही आरोपींना पुन्हा अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्याआधारे काशिमीरा पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्रे फिरवली आणि निर्दोष सुटलेल्या दोघा आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

गुजरात ते अमेरिकेपर्यंत फिरली पोलीस तपासाची चक्रे

ज्यावेळी पोलीस विपुल मनुभाई पटेल याला अटक करण्यासाठी गुजरातच्या बडोदरा येथे गेले, त्यावेळी आरोपी विपुल मनूभाई पटेल हा अमेरिकेत राहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काशिमीरा पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि पोलिसांचे पथक 22 मे 2022 रोजी अमेरिकेत गेले. तेथे 27 मे रोजी आरोपी विपुलला अटक करुन भारतात आणण्यात आले. काशिमीरा पोलिसांनी आरोपी विपुल मनुभाई पटेलला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Accused arrested in America in murder case in Mira Bhayander 20 years ago)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.