सरकारच्या भरमसाठ योजना पण मेळघाटातील कुपोषण थांबेना, 3 महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत सहा वर्षांपर्यंतच्या तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

सरकारच्या भरमसाठ योजना पण मेळघाटातील कुपोषण थांबेना, 3 महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर
फाईल फोटो

अमरावतीमेळघाटातील बालकांचं कुपोषण संपुष्टात यावं, यासाठी सरकार अनेक प्रयत्न करतंय. त्या अनुषंगाने सरकारच्या अनेक योजनाही आहेत. मात्र मेळघाटातील बालकांचं कुपोषण थांबण्याचं काही नाव घेत नाहीय. अशातच गेल्या , 3 महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

मेळघाटात तीन महिन्यांत 49 बालकांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत सहा वर्षांपर्यंतच्या तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यात 29 दिवस ते एक वर्षांपर्यंतच्या 17 बालकांचा समावेश आहे. कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करत असले तरी या मोठय़ा प्रमाणातील बालमृत्यूंमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बालमृत्यू कुपोषणाने झाले नसून त्याची वेगळी कारणं, आरोग्य विभागाचा दावा

धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या आदिवासीबहुल मेळघाटात एकूण 322 गावे आहेत. हा भाग कुपोषित बालके, बालमृत्यू आणि मातामृत्यू यासाठी नेहमीच चर्चेत असतो. पावसाळ्यात कुपोषणाचे प्रमाण वाढते. मुळात हे बालमृत्यू कुपोषणाने झाले नसून, यात जन्माच्या वेळी कमी वजन, कमी दिवसाचे बाळ जन्माला येणे, जंतुसंसर्ग, श्वसनदाह, कमी तापमान, अ‍ॅन्सपेक्सिया, सेप्टिसिमिया, जन्मजात व्यंग इत्यादी कारणे त्यामागे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

तर पावसाळ्यात मेळघाटात मुसळधार पाऊस, दरड कोसळने सह इत्यादी अडचणी येतात तसेच तरी देखील बालमृत्यूचे प्रमाण कमीच आहे तर जनजागृती मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येते अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले यांनी दिली.

मेळघाटातील बालमृत्यूसह इतर सोई सुविधासाठी खोज संस्थेचे अध्यक्ष व गाभा समितीचे सदस्य सातत्याने मेळघाटात काम करत आहे. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, गंभीर परिस्थिती असताना ठरल्याप्रमाणे मेळघाटात बालरोगतज्ज्ञ पाठवण्यात येणार असल्याचे मानवाधिकार आयोगासमोर सांगण्यात आले, पण त्याचा काहीही फायदा नाही. मेळघाटातील बालमृत्यू आणि मातामृत्यू रोखण्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत. बालमृत्यू रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असं मत गाभा समितीचे सदस्य बंड्या साने यांनी व्यक्त केले.

(Amravati Melghat in last 3 Month 49 Child Death)

हे ही वाचा :

Melghat Superstition : पुन्हा एकदा चिमुकल्याच्या टिचभर पोटावर गरम सळईचे ढिगभर चटके

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI