महाशिवरात्रीनिमित्त भक्तांनी फुलले अंचलेश्वर मंदिर; जाणून घ्या मंदिराचा इतिहास

चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक. झरपट नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुराच्या पाण्यामुळं ब-याच अंशी ढासळले होते.

महाशिवरात्रीनिमित्त भक्तांनी फुलले अंचलेश्वर मंदिर; जाणून घ्या मंदिराचा इतिहास
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 12:44 PM

चंद्रपूर : चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर. या मंदिराच्या गाभा-यात एक नैसर्गिक जलकुंड आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार, जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं. तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे. राणी हिराईनं पंधराव्या शतकात या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला. तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्त्व प्राप्त झालं. महाशिवरात्री असो वा श्रावण महिना इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते. इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिरातील जलकुंडातील पाणी राजा खांडक्या बल्लाळशा यानं आपल्या अंगावर घेतल्यानं त्याच्या अंगावरील फोडं नाहीसे झाले. तो वेदनेतून मुक्त झाला आणि त्यामुळंच इथं भव्य मंदिराची उभारणी झाली.

चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक. झरपट नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुराच्या पाण्यामुळं ब-याच अंशी ढासळले होतं. पण आता त्याच्या डागडुजीचं पुरातत्व विभागानं हाती घेतलेले काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं येणा-या पिढ्यांनासुद्धा मंदिर महात्म्य कळू शकणार आहे.

पाण्याला आयुर्वेदिक महत्त्व

पंधराव्या शतकातील हे मंदिर राणी हिराई यांनी बांधलं आहे. येथे शिवलिंग नाही, तर कुंड आहे. येथे जे पाणी येते ते औषधीयुक्त आहे. राजाचा कुष्टरोज या पाण्यामुळे नाहीसा झाला होता. ते येथे भाविकांनी तीर्थ म्हणून वाटले जाते. शिवपार्वतीचा लग्नसोहळा म्हणून शिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो, असं एका भाविकानं सांगितलं. दुसरा भाविक म्हणाला, कोरोनानंतर महाशिवरात्रीचं दर्शन घेता येत आहे. येथील मंदिर हे पुरातन असल्यानं भक्तिभावाने लोकं येथे येतात. बल्लारशाहाचं ऐतिहासिक वारसा लाभलेलं असं हे मंदिर आहे. याची ऐतिहासिक कथाही आहे. या कथेचं महात्मे संपूर्व विदर्भात प्रचलीत आहे.

नागराधामच्या प्राचीन मंदिरात भाविकांची गर्दी

गोंदिया जिल्ह्यातील नागराधाम मंदिरात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात गाभ्याऱ्यातील शिव लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच संपूर्ण परिसर ‘बम बम भोले’च्या गजराने दुमदूमन निघत असतो. मंदिरातील गाभारा आज रात्री १२ वाजतापासूनच भक्तांसाठी खुला करण्यात आला आहे. भाविक दुरूनच पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत आहे. गोंदिया येथे असलेले हे नागरधाम मंदिराची वास्तू दगडातून बांधलेली आहे. अत्यंत मनमोहक असे या मंदिराचे बांधकाम आहे. या मंदिराचे इतिहास म्हणजे गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या कल्याण मासिक १९५१ पत्रिकेमध्ये या मंदिराचा उल्लेख देखील केलेला आहे. यावरून हे मंदिर किती प्राचीन आहे हे लक्षात येते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.