Video : खासदार सुजय विखेंना चांगला जावई मिळेल : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. सुजय विखे पाटील यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्यांचं काम बघून मला वाटतंय, त्यांना चांगला जावई मिळेल,  असं मिश्किलपणे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Video : खासदार सुजय विखेंना चांगला जावई मिळेल : चंद्रकांत पाटील
सुजय विखे पाटील आणि चंद्रकांत पाटील


अहमदनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. सुजय विखे पाटील यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्यांचं काम बघून मला वाटतंय, त्यांना चांगला जावई मिळेल,  असं मिश्किलपणे चंद्रकांत पाटील म्हणाले.

खासदार सुजय विखे यांच्या पुढाकाराने शिर्डी मतदार संघात केंद्र सरकारची वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये साठ वर्षे वयाच्या पुढील व्यक्तींना विविध साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. राहाता शहरात या योजनेसाठी नोंदणीचा कार्यक्रम सुरू असून तालुक्यातील हजारो वृद्ध गरजू नागरिकांनी यात सहभाग घेतला.

सुजय विखे पाटलांना चांगला जावई मिळेल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लोणी येथे आले असता शिर्डीकडे जाताना त्यांनी या कार्यक्रमस्थळी भेट दिली. याठिकाणी खा. सुजय विखे यांनी केलेले नियोजन बघून पाटील यांनी खा. विखेंच्या कामाचे कौतुक केले.

सुजय विखे अतिशय पुण्याचं काम करत आहेत. आपल्या आई वडिलांसमान असलेल्या नागरिकांसाठी ते  केंद्र सरकारची वयोश्री योजना अतिशय नेटकेपणाने राबवत आहेत. त्यांचं नियोजन बघून मी थक्क झालोय. त्यांना खूप चांगला जावई मिळेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

(BJP Chandrakant Patil Appriciate Ahmednagar MP Sujay Vikhe patil Work)

हे ही वाचा :

समीर वानखेडेंच्याविरोधात अखेर ठाकरे सरकारची चौकशीची घोषणा, 4 अधिकाऱ्यांची नावही जाहीर, 25 कोटीच्या डीलच्या आरोपाची झडती

राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI