AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकानात चालले होते दोघे भाऊ, इतक्यात मागून भरधाव पिकअप आली अन्…

दोघं भावंड दुकानात चालली होती. रस्त्यावरुन चालत असतानाच भरधाव पिकअप मागून आले आणि होत्याचं नव्हतं झालं.

दुकानात चालले होते दोघे भाऊ, इतक्यात मागून भरधाव पिकअप आली अन्...
भरधाव कारच्या धडकेत एक ठार, दोन जखमीImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 01, 2023 | 4:21 PM
Share

जितेंद्र पाटील, TV9 मराठी, पालघर : समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाच आज पालघरमध्ये दोन चिमुकल्यांच्या अपघाताची घटना घडली आहे. दुकानात चाललेल्या दोन चिमुकल्यांना भरधाव पिकअपने धडक दिल्याची घटना पालघरमधील मोडगाव येथे घडली आहे. या अपघातात दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघे सख्खी भावंडं होती. या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह फरार झाला आहे. यामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडित कुटुंब आमदार श्रीनिवास वणगा यांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळते.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

पालघरमधील मोडगाव येथील मालकरी कुटुंबीय राहते. मालकरी यांची 11 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा दोघेही दुकानात चालले होते. रस्त्याने चालत असतानाच मागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाने दोन्ही भावंडांना चिरडलं. यानंतर पिकअप चालक वाहन घेऊन फरार झाला. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस आरोपी चालकाचा शोध घेत आहेत. दोन्ही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मालकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नाशिकमध्ये कार-क्रुझर अपघातात 3 ठार, 10 जखमी

नाशिकच्या वणी-सापुतारा महामार्गावर खोरी फाट्याजवळ कार-क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले. अपघातात दोन्ही बाजूच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढले. जखमींवर तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग