पावसातून पिवळे बेडकू पडल्याची अफवा, बुलडाण्याच्या खामगावात नागरिकांमध्ये भीती, पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात…

मान्सूनपूर्व पावसादरम्यान पिवळ्या बेडूकांचा पाऊस पडल्याची अफवा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली. 

पावसातून पिवळे बेडकू पडल्याची अफवा, बुलडाण्याच्या खामगावात नागरिकांमध्ये भीती, पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात...
पिवळे बेडूक
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 12:28 PM

बुलडाणा: मान्सूनपूर्व पावसादरम्यान पिवळ्या बेडूकांचा पाऊस पडल्याची अफवा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली.  परिसरातील तलाव आणि पाणवठ्यांवर गडद पिवळ्या रंगाचे बेडूक अचानक आढळून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही भयभीत झाले आहेत. सदर बेडूक विषारी असल्याची अफवा असून अशा प्रकारचे बेडूक आढळल्यास अपशकून घडत असल्याची अंधश्रध्दा परिसरात आहे. त्यामुळे या बेडकांबाबत विविध शंका आणि कुशंका व्यक्त होत आहेत. पाऊस पडल्यानंतर समाधी अवस्थेतून बाहेर पडणारे हे बेडूक अजिबात विषारी नाहीत आणि पावसातून बेडूक पडत नाहीत , अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञांनी दिली. (Buldana Khamgoan yellow frog came with pre monsoon rain rumours spread)

पिवळ्या बेडकांविषयी अंधश्रद्धा

कोरोना संकटाचे सावट गडद असतानाच खामगाव आणि परिसरात गडद पिवळ्या रंगाचे बेडूक आढळून आले आहेत.हे बेडूक विषारी आहेत.त्याचप्रमाणे अशाप्रकारचे बेडूक आढळून आल्यास अघटीत घडते, अशी अंधश्रध्दा ग्रामीण भागात आहे. त्यामुळे गडद पिवळ्या रंगाचे बेडूक आढळून आलेल्या परिसरात अपशकून घडते, अशी चर्चा ग्रामीण भागात होत आहे.

पावसातून बेडूक पडल्याची अफवा

तलाव आणि पाणवठ्यांवर आढळून येणारे बेडूक मान्सूनपूर्व पावसातून पडल्याची जोरदार चर्चा ग्रामीण भागात होत आहे. पावसातून मासे पडू शकतात. तर बेडूक का नाही? असा प्रश्न ग्रामीण भागातील काही जुन्या जाणत्या नागरिकांनी उपस्थित केलाय. त्यामुळे खामगाव आणि परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

पर्यावरणतज्ज्ञ काय म्हणतात

दुसरीकडे खामगाव आणि परिसरात आढळून आलेले बेडून उष्मकालीन समाधीतून बाहेर आलेले नर बेडूक आहेत. मिलनोत्सूक असलेले हे बेडूक मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पाऊस पडल्यानंतर समाधी अवस्थेतून बाहेर पडणारे हे बेडूक अजिबात विषारी नाहीत आणि पावसातून बेडूक पडत नाहीत , अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञांनी दिली.

अकोला बुलडाणा सीमेवरील मन नदीवरील पूल खचला

दोन दिवसापूर्वी अकोट-शेगाव मार्गावरील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोहारा गाव जवळील मन नदीवरील पुलाचा काही भाग खचला होता, काल या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने माती आणि मुरूम टाकून या मार्गावरून वाहतूक सुरू केली होती.. मात्र आज सकाळीच पुन्हा याच ठिकाणी मालवाहू ट्रक फसलाय… यामुळे अकोट- शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद झालीय..

संबंधित बातम्या:

मोदी सरकारचा निर्णय पथ्यावर पडला; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार एका महिन्यात मालामाल

हरणटोळ सापांच्या विष्ठेवर संशोधन, दोन जिवाणूंचा शोध, मानवाला रोगांपासून वाचवण्यास मदत होणार

(Buldana Khamgoan yellow frog came with pre monsoon rain rumours spread)

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.