AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron Update | आधी औरंगाबाद, अकोला आता नांदेडमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव; दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह

अकोला, औरंगाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळल्यानंतर आता मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातदेखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोन जण ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Omicron Update | आधी औरंगाबाद, अकोला आता नांदेडमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव; दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह
Omicron
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 5:20 PM
Share

नांदेड : राज्यात ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या रुपाचे संकट विस्तारताना दिसत आहे. राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असून वेगवेगळ्या जिल्ह्यात रुग्ण आढळत आहेत. अकोला, औरंगाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळल्यानंतर आता मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातदेखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोन जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नांदेडमध्ये दोघांना ओमिक्रॉनची लागण

मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर येथे मागील आठवड्यात तिघे जण दक्षिण आफ्रिकेतून आले होते. खबरदारी म्हणून या तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. दरम्यान तिघांपैकी दोघे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती येथील आरोग्य विभागाने दिलीय.

अकोला, औरंगाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव

मागील काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. काल म्हणजेच 26 डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्यात एका महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ही महिला काही दिवसांपूर्वी दुबईतून परतली होती. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातदेखील 25 डिसेंबर रोजी दोघांचा ओमिक्रॉन अवहाल पॉझिटिव्ह आला होता.

लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज

तर दुसरीकडे कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले आहेत.

जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सध्या 5 लाख डोसेस दिवसाला दिले जातात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.

राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के

डॉ. व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ होत आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही व्यास यांनी सांगितले.

इतर बातम्या :

VIDEO: चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रपती राजवट स्वीकारून केंद्राकडे कारभार द्या; शरद पवार म्हणतात, त्यांना माझ्या शुभेच्छा

KL Rahul | ’99 धावांवर असताना माझ्या मनात…’ राहुलने उघड केला भावनिक गुंता

Nashik Tourism| त्र्यंबकचरणी भक्तांचा कल्लोळ…नाशिकमध्ये पर्यटकांचा बहर; सारे रिसॉर्ट फुल्ल….!

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.