AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान होणार, पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचना

पालकमंत्री देसाई म्हणाले, येत्या 15 जुलैपासून आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आवश्यक कार्यवाही करावी. तत्पूर्वी शासकीय व खाजगी शाळेतील सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे.

साताऱ्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान होणार, पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचना
shambhuraj desai
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 12:03 AM
Share

सातारा : पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरतात. वाशिम जिल्ह्यात साथीच्या आजारांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच हे आजार पसरू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण व पिकांची स्थिती याबाबतचा आढावा घेण्यासाठी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. (Corona vaccination drive to be intensified in Satara, Guardian Minister Shambhuraj Desai’s order)

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे उपसंचालक ठोंबरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

काय म्हणाले शंभूराजे देसाई?

पालकमंत्री देसाई म्हणाले, येत्या 15 जुलैपासून आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आवश्यक कार्यवाही करावी. तत्पूर्वी शासकीय व खाजगी शाळेतील सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात लागू असलेल्या कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. नॉन-कोविड रुग्णांवर सुद्धा चांगल्या प्रकारे उपचार करण्यात यावे. कोणत्याही रुग्णाची तक्रार येणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

तातडीने लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्यात पिकांची स्थिती चांगली आहे, ही आनंदाची बाब आहे, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, अतिवृष्टीने जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर तात्काळ दखल घेऊन पंचनामे करण्यात यावे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे तातडीने लसीकरण पूर्ण करण्यात यावे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस देण्यात यावा. यासाठी संबंधित यंत्रणेने व्यक्तीशी संपर्क साधून दुसऱ्या डोससाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहित करावे. जिल्ह्यात उभारण्यात आलेले प्राणवायू प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, याकडे लक्ष द्यावे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगिलते.

काय म्हणाले जिल्हाधिकारी षण्मुगराजन?

जिल्हाधिकारी षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. दररोज सरासरी 1200 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर दिला जात असून 3 लाख 15 हजार पात्र व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिटच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

निर्जंतुकीकरण करण्यासाठी गावपातळीवर उपाययोजना करणार

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांची शक्यता लक्षात घेता आरोग्य संस्थेमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध असून पिण्याचे पाणी दूषित झाल्यास पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी गावपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. 15 जुलैला आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने संबंधित शिक्षकांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीविषयी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी माहिती दिली. (Corona vaccination drive to be intensified in Satara, Guardian Minister Shambhuraj Desai’s order)

इतर बातम्या

स्वारातीम विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थांना पुन्हा संधी

भाजप भूमिपुत्रांच्या खंबीरपणे पाठीशी, कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही : प्रविण दरेकर

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.