साताऱ्यातील 379 गावे बाधित, 1,324 कुटुंबांचे स्थलांतर, 18 मृत्यू, 24 जण बेपत्ता तर 3,024 जनावरांचा मृत्यू

| Updated on: Jul 24, 2021 | 8:22 PM

गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

साताऱ्यातील 379 गावे बाधित, 1,324 कुटुंबांचे स्थलांतर, 18 मृत्यू, 24 जण बेपत्ता तर 3,024 जनावरांचा मृत्यू
Satara Landslide
Follow us on

सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, 3 हजार 24 जनावरांचादेखील मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले असून एनडीआरएफची एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली. (Heavy rains affect 379 villages in Satara, 1,324 families displaced, 18 killed, 24 missing and 3,024 animals killed)

जिल्ह्यातील एकूण 167 गावे पूर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झाली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पूर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अंशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील 10 गावे पूर्णत: व 60 गावे अंशत: अशी एकूण 70 गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पूर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील 13 गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील 102 गावे अंशत: बाधित झाली आहेत.

जिल्ह्यात 18 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण अद्याप बेपत्ता आहेत, त्यांना शोधण्याची काम सुरु आहे. तर 3 हजार 24 पशुधनाचा (जनावरांचा) मृत्यू झाला आहे. यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत्यू, 2 जण बेपत्ता व 20 पशुधन मृत्यू, कराड तालुक्यात 3 हजार पशुधन मृत्यू (कोंबडी), पाटण तालुक्यात 12 मृत्यू व 20 जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत्यू व 2 पशुधन मृत्यू, सातारा तालुक्यात 2 पशुधन मृत्यू, जावली तालुक्यात 2 मृत्यू व 2 जण बेपत्ता झाले आहेत.

जिल्ह्यातील 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जण स्थलांतरित

जिल्ह्यातील वाई, कराड, पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील 72 कुटुंबातील 390 जण, कराड तालुक्यातील 876 कुटुंबातील 3 हजार 836 जण, पाटण तालुक्यातील 325 कुटुंबातील 1 हजार 300 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 51 कुटुंबातील 130 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण 3 एनडीआरएफच्या टीम कार्यरत असून एका टिमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

इतर बातम्या

Breaking : लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू, वरळीच्या हनुमान गल्लीतील धक्कादायक घटना

पूर आणि दरडीमुळे राज्यात 76 मृत्यू, 59 बेपत्ता, 90 हजार लोकांचं स्थलांतर, 75 जनावरे दगावली: अजित पवार

BREAKING साताऱ्यातील मीरगावात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू

(Heavy rains affect 379 villages in Satara, 1,324 families displaced, 18 killed, 24 missing and 3,024 animals killed)