AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING साताऱ्यातील मीरगावात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मीरगावात दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे, गुरुवारी रात्री अकरा वाजता दरड कोसळली होती

BREAKING साताऱ्यातील मीरगावात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू
Satara Mirgaon landslide
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 8:14 PM
Share

सातारा : सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मीरगावात (Mirgaon Satara) दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे, गुरुवारी रात्री अकरा वाजता दरड कोसळली होती, त्यामुळे घरे जमीनदोस्त झाली, काल गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असता तरी ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना मीरगावात जेसीबी सारखे मशनरी किंवा अन्य कोणतीच आली नसल्यामुळे काढण्यात यश आले नाही. शिवाय वर जोरदार पाऊस सुरू होता , आता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन जणांचे मृतदेह काढले आहेत , उर्वरित सात जणांचे मृतदेह काढले जात आहेत.

काल दिवसभर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी जेसीबी गावात पोहोचू शकली नाही. मीरगावात मोटारसायकल पोहोचणे सुद्धा मुश्किल आहे. तब्बल 40 तासांनंतर गावात दुपारी 3 वाजता जेसीबी दाखल.  त्याच्याआधी स्थानिक नागरिक करत होते. मृतदेह शोधण्यासाठी भरपावसात शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मीरगावात नेमकं काय घडलं?

जमीनदोस्त झालेल्या घरात मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. काल ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना पावसामुळे काढता आले नाही. गुरुवारी रात्री 11 वाजता कोसळली होती दरड. दुसऱ्या दिवशी प्रशासनाला कळले. मीरगावात लोक रात्री जीवांच्या आकांताने ओरडत होते. दरड कोसळताना काही जण पळून गेले आणि जी लोक राहिली ती दबली गेली.

काल प्रशासनाने प्रयत्न केले मात्र पावसामुळे बचावकार्य सुरुच झालं नाही. या गावात जेसीबी सारख्या यंत्रणा येणे अशक्य आहे. गावातील 200 लोकांना वनविभाग आणि स्थानिकांनी उशिरा सुरक्षितस्थळी हलविले.

मीरगाव कोयना धरण क्षेत्रातील गाव आहे. मीरगावासह अन्य गावांचा  संपर्क तुटला आहे. अडीच किलोमीटर कोयनेच्या बॅक वॉटर आणि त्यानंतर दीड किलोमीटर डोंगरावर चढून मीरगावात टीव्ही9 मराठीची टीम दाखल झाली. या गावात मोबाईल बंद आहेत,वीज कनेक्शन चार दिवसांपासून बंद आहे.

 होत्याचे नव्हते झाले

कोयनानगर परिसरातल्या ज्या दरडाच्या पायथ्याशी गेल्या कित्येक वर्षापासून सुखाने संसार करणाऱ्या लोकांचे क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे, दरड घरावर  कोसळल्यामुळे जमीन घरे जमीनदोस्त झाली आहेत, लोकांनी गाव सोडून स्थलांतरित केलय, तर संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर पडली आहेत, ज्या  दरडाच्या पायथ्याशी आम्ही खेळलो बागडलो तू दरड आमचा काळ म्हणून येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेवंताबाई बाकाडे आणि देवजी बाकाडे यांचे पुत्रांनी  व्यक्त केली आहे.

VIDEO : साताऱ्यात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.