VIDEO : काळ आला होता पण…चंद्रपूरमध्ये विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही; घटना सीसीटीव्हीत कैद

अपघातग्रस्त कार यवतमाळमधील एका व्यापारी असल्याची माहिती मिळते. सदर व्यापारी आपल्या कारमधून कुटुंबासोबत सिरोंचाच्या दिशेने चालले होते. कारमधून एकूण चार लोक होते. बल्लारपूर शहरातील मुख्य रस्त्यावर सदर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने कार दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली.

VIDEO : काळ आला होता पण...चंद्रपूरमध्ये विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही; घटना सीसीटीव्हीत कैद
चंद्रपूरमध्ये विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी नाहीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 9:38 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक विचित्र अपघात (Accident) घडला आहे. मुख्य मार्गावर भरधाव वेगातील एक कार (Car) दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली. या अपघातात अगदी थोडक्यात बचावलेला दुचाकीवरील युवक काही घडलेच नाही असे भासवत भरधाव वेगात पुढे निघूनही गेला. तर दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून कार उलटली. उलटलेली कार देखील उलटून पुन्हा सरळ होत मार्गावर स्थिरावली. विशेष म्हणजे कारमध्ये बसलेल्यांना कुठलीही इजा झाली नाही. अत्यंत भीषण अपघात होऊनही कोणालाही खरचटले देखील नाही. दरम्यान, ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

अपघातग्रस्त कार यवतमाळमधील एका व्यापारी असल्याची माहिती मिळते. सदर व्यापारी आपल्या कारमधून कुटुंबासोबत सिरोंचाच्या दिशेने चालले होते. कारमधून एकूण चार लोक होते. बल्लारपूर शहरातील मुख्य रस्त्यावर सदर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने कार दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली. सुदैव म्हणजे एवढा भयानक अपघात घडूनही दुचाकीस्वार किंवा कारमधील कुणालाही साधे खरचटले देखील नाही. दुचाकीस्वारही दुचाकी उटलून पुन्हा भरधाव वेगात निघून गेला. तर दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून कार उलटली. दुसऱ्या क्षणाला उलटलेली कार देखील उलटून पुन्हा सरळ होत मार्गावर स्थिरावली. अपघाताची अंगाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, ही म्हण या घटनेने सार्थ केली आहे. (Horrific car and bike accident in Chandrapur, incident captured on CCTV)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.