AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्या मुलीची गाडी थेट मतदान केंद्रावर, आधी मतदान नंतर लग्न, ग्रामपंचायत निवडणुकीचे वाचा आणखी काही किस्से

विटाच्या भाळवणी येथील अंजली जनार्दन शिंदे हिचा आजच विवाह होता. अगदी काही तासावरच अक्षदेची वेळ असतानाच तिने सजवलेल्या गाडीतूनच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला.

नवऱ्या मुलीची गाडी थेट मतदान केंद्रावर, आधी मतदान नंतर लग्न, ग्रामपंचायत निवडणुकीचे वाचा आणखी काही किस्से
सांंगलीत नवरी आणि दुसऱ्या एका नवरदेवानं आधी मतदान केलं. नंतर त्यांचं लग्न झालं.
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 18, 2022 | 6:24 PM
Share

सांगली :  सांगली जिल्ह्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केले. तर दुसरीकडे अक्षदा डोक्यावर पडायला अगदी काही तासच बाकी असताना सजवलेल्या गाडीतून नवरी मुलगी मतदान करायला मतदान केंद्रावर पोहचली. उपस्थिती लावून तीनं आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर असाच प्रकार जत तालुक्यातील उमदी येथे घडला. नवरोबानी डोक्याला बाशिंग बांधून मतदानाचा हक्क बजावला.

विटाच्या भाळवणी येथील अंजली जनार्दन शिंदे हिचा आजच विवाह आहे. अगदी काही तासावरच अक्षदेची वेळ असतानाच तिने सजवलेल्या गाडीतूनच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. एकीकडे आयुष्यभराचा साथीदार मिळाल्याची खुशी आणि दुसरीकडे आपण मतदानातून निवडणारा उमेदवार याचे हास्य तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आले.

दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील विठ्ठल नगर येथील सुनील सातपुते या नवऱ्याने सुद्धा लग्नाच्या आधी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. डोक्यावर बाशिंग बांधून मतदान केंद्रात दाखल होऊन मतदान केले. तर या नवरोबाला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

दरम्यान, आज भंडारा जिल्ह्यात 303 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. यात वयोवृद्धाने देखील प्रकर्षाने सहभाग नोंदविला आहे. पवनीच्या बाम्हनीत 98 वर्षे तर जेवनाळयात 101 वर्षे वयाच्या आजीने मतदान केले आहे.

लाखनी तालुक्याच्या जेवनाळयात 101 वर्षांच्या रड़ू बाई शहारे तर बाम्हणीच्या 98 वर्षाच्या आजी भागरथा जिवतूजी ईखार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकीकडे काही लोक मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून इंजॉय करीत असताना इतक्या वयाच्या आजीने मतदानात भाग घेतला.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार