सांगली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे बोलण्यात रोखठोक आहेत. जेकाही कुणाला बोलायचे ते स्पष्टपणे बोलतात. सांगली (Sangli) येथील एका रस्त्याच्या कार्यक्रमात ते स्पष्टचं बोलले. रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू. असा सज्जड दम केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला (Contractor) दिला. सांगलीच्या अष्टा या ठिकाणी पेठ – सांगली रस्त्याच्या चौपदरीकरण भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.