18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे लसींचा साठा आहे का; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

भारत देशात 140 कोटी लोकसंख्या असून सध्या 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण अजुन पुर्ण झाले नाही. | covid vaccines Prithviraj Chavan

18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे लसींचा साठा आहे का; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 12:00 PM

सातारा: देशात अद्याप 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले नसताना केंद्र सरकारने 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. अगोदरच लसींचा तुटवडा असताना आता 18 वर्षांवरील नागरिकांना लस कुठून देणार, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी उपस्थित केला आहे. (Centre’s callousness has resulted in the present Oxygen crisis says Prithviraj Chavan)

ते बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. भारत देशात 140 कोटी लोकसंख्या असून सध्या 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण अजुन पुर्ण झाले नसुन तरीदेखील 18 वर्षावरील सर्वांना लसीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तेवढी लस भारतात आहे का, याचचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अन्यथा 1 मे नंतर गर्दी झाली तर हे दुर्दैव म्हणावे लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

‘केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत’

देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांच्या 20 ऑक्टोबर 2020 ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते. पाच महिन्यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत extremely comfortable आहे. मागील दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही, असे सचिवांनी म्हटले होते.

ऑक्टोबर 2020 मध्येच 1 लाख टन वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असेदेखील सांगितले होते. अशा या फाजील आत्मविश्वासामुळे आज देश गंभीर संकटात असून मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

संबंधित बातम्या:

1 मे रोजी 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार नाही?; वाचा, आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

कोरोना लसीची किंमत कमी करा; केंद्र सरकारकडून सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

(Centre’s callousness has resulted in the present Oxygen crisis says Prithviraj Chavan)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.