गौतमी पाटील हिने ‘पाटील’ आडनाव वापरावे की नाही?, मराठा महासंघात दुमत; एका गटाचा गौतमी हिला पाठिंबा

मराठा संघटनेची भूमिका म्हणजे संपूर्ण मराठा समाजाची भूमिका आहे असं मला वाटत नाही. नको ते वाद घालून तुम्हाला तुमची प्रसिद्धी वाढवायची की गौतमी पाटीलची वाढवायची हे कळत नाही. अशा गोष्टींचा मी तीव्र निषेध करतो, असं मराठा नेते शंभु पाटील यांनी म्हटलं आहे.

गौतमी पाटील हिने 'पाटील' आडनाव वापरावे की नाही?, मराठा महासंघात दुमत; एका गटाचा गौतमी हिला पाठिंबा
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 8:30 AM

जळगाव : एकीकडे पुण्यामध्ये मराठा महासंघाने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला पाटील आडनाव लावण्यास विरोध केला आहे. तर दुसरीकडे मात्र जळगावतील मराठा महासंघाने गौतमी पाटीलला पाठिंबा दिला आहे. पाटील हे आडनाव कुणाची मक्तेदारी नाही. पाटील हे आडनाव कोणतीही जात दर्शवत नाही. हे आडनाव म्हणजे एक उपाधी आहे. ज्यांच्याकडे पाटीलकी असायची ते पाटील आडनाव लावायचे. अगदी ब्राह्मणांमध्येही पाटील आडनाव आहे. त्यामुळे पाटील आडनावावर कुणीही मक्तेदारी सांगू नये. गौतमी पाटीलला आडनाव वापरण्यापासून कोणीही रोखू नये, असं मराठा महासंघाने म्हटलं आहे.

मराठा सेवा संघाचे नेते सुरेंद्र पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गौतमी पाटीलचं आडनाव पाटील आहे, म्हणून मराठा समाजाची बदनामी होतेय असं कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. मला ते वैयक्तिक पटत नाही. सामाजिकरित्या पाटील हे आडनाव हे मराठा समाजाचं आहे, असं मला वाटत नाही. कारण मी स्वत: पाटील आहे. पण आमचं मूळ आडनाव जाधव आहे. पण आमच्या घरात पाटीलकी असल्याने आमच्या घरच्यांनी पाटील आडनाव लावलं आहे, असं सुरेंद्र पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मराठा समाजाची बदनामी नाहीच

मला अनेक ब्राह्मण मंडळी माहीत आहेत की ज्यांचं आडनाव पाटील आहे. कारण त्यांच्या घरात पाटीलकी होती. काही ओबीसी आणि बीसींच्या घरीही पाटीलकी होती. त्यामुळे त्यांचं आडनावही पाटील आहे. पाटील हे आडनाव काही मराठा समाजाचा हक्क नाही. गौतमी पाटील ही समृद्ध कलाकार आहे. तिने तिच्या नावाचा वापर कलेसाठी केला तर त्यावर प्रतिक्रिया येऊ नये. पाटील आडनावामुळे मराठा समाज बदनाम होईल किंवा गौतमी पाटीलमुळे मराठा समाज बदनाम होईल असं वाटत नाही, असंही सुरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलं.

मराठा नेते शंभु पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाटील कोणी लावायचं? आता मी पाटील आहे. पण माझं कुळ वेगळं आहे. कारण मी बाविस्कर आहे. आमच्या वाडवडिलांनी केव्हा तरी ते गाव सांभाळलं असेल त्याची ती पाटीलकी होती. त्यामुळे त्यावरून पाटील हे आडनाव आलं. पण आमची कुळं वेगळी आहेत. मग तो देशमुख असो की पाटील असेल. प्रत्येकाचं कुळ वेगळं आहे. पाटील ही उपाधी आहे. ती जात नाही. कितीही इतर जातीची लोक पाटील हे आडनाव लावतात, असं शंभु पाटील म्हणाले.

आडनाव लावू नको कसं म्हणू शकता?

तुम्ही कसं म्हणू शकतात हे आडनाव लावू नको? मी माझं आडनाव काय ठेवायचं याची मला संविधानच परवानगी देतं. मी कोणतंही नाव घेऊ शकतो. माझ्या देशातील संविधान मला परवानगी देत. त्यामुळे असंवैधानिक गोष्टी करून तेढ निर्माण करू नका. लावणी हा सांस्कृतिक कला प्रकार आहे. पण बाया नाचवणं कुणाला आवडतं हो. गौतमी पाटील यांनीही काही साधनशुचिता पाळली पाहिजे. त्यांनी काही गोष्टींची माफी मागितली आहे. मी असं करणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असंही शंभु पाटील म्हणाले.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.