किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेडला जाणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती, पुढचा नंबर कोणाचा ?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी सोमय्या नांदेडला येणार आहेत, असं सांगितलं आहे. आधी किरीट सोमय्या यांचं सूचक वक्तव्य आणि नंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलेली माहिती या सर्व गोष्टींमुळे भाजपच्या रडारवर असलेला नांदेडमधील तो बडा नेता कोण ? असा प्रश्न सगळीकडे विचारला जात आहे.

किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेडला जाणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती, पुढचा नंबर कोणाचा ?
CHANDRAKANT PATIL KIRIT SOMAIYA
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 9:21 PM

नांदेड : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट योमय्या यांनी दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर आणणार असं वक्तव्य नुकतंच केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी सोमय्या नांदेडला येणार आहेत, असं सांगितलं आहे. आधी किरीट सोमय्या यांचं सूचक वक्तव्य आणि नंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलेली माहिती या सर्व गोष्टींमुळे भाजपच्या रडारवर असलेला नांदेडमधील तो बडा नेता कोण ? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

26 किंवा 27 तारखेला किरीट सोमया नांदेडला येणार

ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. माझ्या हसण्यावरुन समजून जा, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आज पुन्हा ईडीच्या कारवायाबाबत तुम्हाला कसं कळत असं मंत्री अशोक चव्हाण यांनी विचारलं. येत्या 26 किंवा 27 तारखेला किरीट सोमया नांदेडला येणार आहेत. करा बातमी मोठी, असं पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता ईडीच्या रडारवर नेमकं कोण असं विचारलं जात आहे. तसेच दिवाळी झाली की एका बड्या नेत्याचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असं किरीट सोमय्या यांनीही आजच सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील तसेच किरीट सोमय्या या दोघांच्याही वक्तव्यानंतर आता ईडीच्या रडारवर असलेला नांदेडमधील बडा नेता कोण असावा याचे अंदाज बांधले जात आहेत.

देगलूर पोटनिवडणूक आणि बड्या नेत्याचा घोटाळा

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काहीही झालं तरी ही जागा खिशात घालणारच असं चंग भाजप तसेच काँग्रेसने बांधला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार असं वक्तव्य केल्याममुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोप करुन देगलूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसमोर अडचणी निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा भाजपचा विचार असल्याचंही म्हटलं जात आहे.

आरोप करताच तपास संस्थांची चौकशी नेत्यांच्या मागे

किरीट सोमय्या यांनी यापूर्वी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापूसन ते मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अनिल परब अशी ही मोठी यादी आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर लगेच ईडी, आयकर विभाग अशा तपास संस्थांची चौकशी या नेत्यांच्या मागे लागलेली आहे. त्यामुळे सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता कोणाचा नंबर ? कोण तपास संस्थांच्या रडारवर ? असं विचारलं जाऊ लागलंय.

इतर बातम्या :

12 तास वीज, 15% व्याजासह एफआरपी देण्याची मागणी, यंदाच्या ऊस परिषदेत नेमके कोणते ठराव मंजूर ?

SSC HSC Board Supplementary Exam Result | इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा बुधवारी निकाल

एकदा चार्ज केल्यावर मुंबई ते अहमदाबाद नॉनस्टॉप प्रवास, Honda ची इलेक्ट्रिक कार सज्ज

(kirit somaiya will go to nanded on 27 october information given by chandrakant patil)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.