AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिका कर्मचारी, पोलिसांविरोधात किरीट सोमय्यांची तक्रार, अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी

किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात नवघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दसऱ्याच्या दिवशी अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमय्या आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.

मुंबई महापालिका कर्मचारी, पोलिसांविरोधात किरीट सोमय्यांची तक्रार, अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी
किरीट सोमय्यांची नवघर पोलिसांकडे तक्रार
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 3:06 PM
Share

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात नवघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दसऱ्याच्या दिवशी अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमय्या आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. पोलीस आणि महापालिका अशा दोघांनीही हे मान्य केलं की त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर आदेश नव्हता, असा दावा सोमय्या यांनी केलाय. (Complaint of Kirit Somaiya against BMC employees and police)

पोलीस आणि महापालिका अशा दोघांनीही कबूल केलं आहे की त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर आदेश नव्हता. ते विदाऊट एनी सिक्युरिटी कन्सेंट परमिशन तुमच्या परिसरात घुसले. म्हणून दोघांनीही बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल यासंबंधात एफआयआर रजिस्टर करून पोलिसांनी दोन्ही संबंधित अधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेल्या अर्धा डझन गुंडांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी सोमय्या यांनी केलीय. महत्वाची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षांचे दोन गुंड सुद्धा त्यात होते. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तर कार्यालयाची नासधूस केली असती. त्यामुळे मला यासंबंधी चौकशी आणि कारवाई हवी आहे, असं सोमय्या म्हणाले.

‘पोलिसांची माफियागिरी खपवून घेणार नाही’

19 सप्टेंबरला याच मुलुंड, नवघर पोलिसानी बेकायदेशीरपणे मला सहा तास कोंडून ठेवलं त्याचीही तक्रार या पोलीस स्टेशन केली होती. 19 सप्टेंबरला आज एक महिना झाला तरी काहीही केलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे त्यांनी तक्रार रिजेक्ट करावी किंवा एफआयआर दाखल करावा. मुंबई पोलिसांनी त्याची चौकशीही केली नाही, याचा अर्थ हे पोलिसांचे माफियागिरी करत आहेत. हा प्रकार आपण खपवून घेणार नसल्याचंही सोमय्यांनी म्हटलंय.

‘..तर पोलिसांविरोधात कारवाईचा माझा मार्ग मोकळा’

पोलीस अथॉरिटी आणि दुसरं हायकोर्ट अशा दोन्हीकडे जाण्याचे आमचे मार्ग आता मोकळे झाले आहेत. एका महिन्याच्या आत त्याची दखल घेऊन कारवाई करायची असते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सात दिवसाच्या आत जर पोलिसांनी कारवाई केली नाही, दखल घेतली नाही तर पोलिसांविरोधात कारवाई करण्यासाठी माझा मार्ग मोकळा असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

‘महापालिका अधिकारी, पोलिसांना घडा शिकवणार’

ठाकरे सरकारची गुंडगिरी सुरु आहे. पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग केला जातोय. त्यांच्या लक्षात आलं की ठाकरे आणि पवारांच्या माफियागिरीला किरीट सोमय्या घाबरत नाही. माफियागिरी करणाऱ्या पोलिसांना आणि महापालिका इंजिनियरला ही सोडणार नाही. कुणाच्या घरात, परिसरात दसऱ्याच्या दिवशी येत नाहीत. त्याचा धडा मी पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांना शिकवणार, असा इशाराही सोमय्यांनी दिलाय.

इतर बातम्या :

‘मिशन कवचकुंडल’ अभियान दिवाळीपर्यंत चालू राहणार, लसीकरणाचा वेग वाढवणार- आरोग्यमंत्री

मुंबई महापालिकेच्या 82 हजार कोटींच्या ठेवी अभासी! प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत खळखळाट, काँग्रेसचा दावा

Complaint of BJP leader Kirit Somaiya against BMC employees and police

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.